Dictionaries | References

तर्फ

   
Script: Devanagari
See also:  तरफ

तर्फ     

 स्त्री. १ दिशा ; बाजू ; कड . २ ( भांडण , कज्जा इ० तील ) पक्ष ; बाजू ; कड . त्याच्या तरफेचे भाषण हा बोलतो . ३ ताबा ; जिम्मा ; राखण ; निसबत . हा दागिना तुमच्या तरफेस असू द्या . ४ हुकमत ; अंमल ; ताबा . तुमच्या तरफेच्या स्वारांची हजिरी घ्यावयाची आहे . ५ देशाचा एक लहान भाग ; कांही विशिष्ट संख्याक गांवांचा गट ; महाल . अशा कांही तरफा मिळून परगणा होतो . देश पहा . मराठेशाहीत साठ गावे मिळून तरफ . - गांगा ४२ . महालाचा संबंध दाखवायचा असल्यास गांवामार्गे हा शब्द योजतात . उदा० मौजे ओण , तरफ राजापूर . ६ तरफबंदी - पद्धतीखालील जमीनीचा एक वर्ग . [ अर . तर्फ , तरफ ] सामाशब्द -
 स्त्री. तरफ पहा .
०दार  पु. १ तरफेत असलेल्या गांवांचा वसूल करणारा , त्यावर हुकमत चालविणारा अधिकारी ; महालकरी . हा मामलतदाराच्या हाताखाली असतो . - वाडमा १ . ३ . २ तरफ म्हणून जो जमीनीचा विशिष्ट विभाग तिचा मालक - वि . पक्षपाती ; कैवारी ; दोस्त . [ तरफ + दार ]
०दारी  स्त्री. पक्षपात ; कैवार ; एखादी बाजू सावरुन धरणे ; वकीली [ तरफदार ]
०बंदी  स्त्री. १ जमीनमहसुलाची एक पद्धत . हींत गांवांतील शेतजमीनीचे मोठेमोठे भाग पाडून एक एक भाग गांवांतील शेतजमीनीचे स्वतंत्रपणे लागवड करण्यास दिलेला असतो . यांत कुटुंबातील वांटण्या येत नसून सबंध कुटुंबाकडील जमीनीच्या सार्‍याला ते एक कुटुंब जबाबदार धरतात . याच्या उलट कासबंदी पहा . २ शेताभोवती बांध , कुंपण घातलेला . [ तरफ + बंदी ]
०सानी  पु. दुसरा पक्ष ; प्रतिपक्ष . बद - अहदीची दर्याफ्त दोघां शरिकांनी करुन तरफ - सानीकडे नसीयत - पूर्वक सांगून पाठवावे . - र ७ . ३ . [ फा . तरफि सानी = दुसरा पक्ष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP