|
पु. चोर . सर्व मुलखांत चोरटयांचा उपद्रव फार होता . - विवि ८ . ८ . १५४ . - वि . १ फसव्या ; अप्रामाणिक ; लुच्चा . २ खाजगी ; गुप्त ; लोकांना न कळत करावयाचा ( धंदा , व्यापार इ० ). चोरटया पापामुळें मन जितकें भित्रें होतें तितकें भित्रें दुसर्या कशानें होत नाही . - बाय ४ . १ . ३ वरून न दिसणारा ( ताप इ० ). [ चोर ] ( वाप्र . ) चोरटयासारखें होणें - संकोच वाटणें ; कांहीं अपराध , चूक केल्याप्रमाणें वाटणें . बाळु व सुनंदा यांना अगदींच चोरटयासारखें झालें होतें , तें आतां जाऊन तेही सुशीलेकडे अर्धस्फुट स्मितदृष्टीनें पहात आपाअपल्या बिर्हाडीं गेले . - सुदे ८ . म्ह० चोरटा हुशार मेहनती दिलगीर . सामाशब्द - ०ताप पु. बारीक ताप ; कणकण . ०धंदा चोरटीविद्या - पुस्त्री . १ गुप्त धंदा ; लपून छपून करावयाचा धंदा ; ठकबाजीचा , फसवेगिरीचा धंदा . २ ज्यांत लाभ न होतां उलट खोट येते असा धंदा . चोरटावा - पु . चोरटेपणा ; चोरवड . - गांगा २२९ . चोरटावें टाई - नस्त्री . ( सामा . ) चोरावें , चोरवडा , चोरवण पहा . चोरटी - स्त्री . चोरून होणारें नुकसान . वेठ , बिगार चंदीदाणा , चोरटी , वर्गणी . - खेया २२ . ०नजर स्त्री. चोरनजर ; चोरून पहाणें . मी पोहत असतांना ज्या प्रेमाच्या चोरटया नजरेनें तूं मजकडे पहात होतीस ... - बाय ५ . २ . चोरटें - न . चोरांचा उपद्रव . - शर . चोरटे चाळे - पु . चोरासारखें आचरण , वागणूक . ( नेहमीं बहुवचनीं प्रयोग ). चोरटेंपण - न . चोरटेपणा ; चौर्य ; चोराची कृति वगैरे . [ चोरटा ] चोरटें पीक - न . कणसांत चांगलें भरलेलें पण काडांच्या आंखुडपणामुळें उठावदार न दिसणारें , वरून भिकार दिसणारें पीक .
|