|
पंचाहत्तर परमेश्वराच्या प्रधान विभूति परमेश्वर सर्व व्यापक आहे, तथापि भगवान् श्रीकृष्णानें प्ररमेश्वरी अंश म्हणून सांगितलेल्या पंचाहत्तर प्रधान विभूती या आहेत - १ आत्मा, (प्राणिमात्रांचा) २ सकला सृष्टींचा आदि (उत्प्त्ति) मध्य (स्थिती) व अंत, (लय) ३ आदित्यांत विष्णु ४ जोतींत सूर्य, ५ मरुद्नणांत मरीचि, ६ नक्षत्रांत चंद्रा, ७ वेदांत सामदेव, ८ देवांपैकीं इंद्र, ९ इंद्रियांत मन, १० प्राण्यांत चेतना, ११ रुद्रांत शंकर, १२ यक्षांत कुबरे, १३ वसूंमध्यें अग्नि, १४ पर्वतांत मेरू, १५ पुरोहितांत बृहस्पति, १६ सेनापतींत स्कंद, १७ जलाशयांत सागर, १८ महर्षीमध्यें, भृगु, १९ शब्दरूप वाणींतील एकाक्षर, (ॐ कार) २० यज्ञांत जप, २१ स्थावरांत हिमालय, २२ वृक्षांत अश्वत्थ, २३ देवर्षीमध्यें नारद, २४ गंधर्वांत चित्ररथ, २५ सिद्धांमध्यें कपिलमुनि, २६ घोडयांत उच्चैःश्रवा, २७ हत्तींत ऐरावत, २८ मनुष्यांत राजा, २९ हत्यारांत वज्र, ३० गाईमध्यें कामधेनु ३१ प्रजा उत्पन्न करणारा राजा, ३२ सर्पांत वासुकि, ३३ नागांत अनंत, ३४ जलदेवांत वरुण, ३५ पितरांत अर्यमा, ३६ नियमन करणारांत यम, ३७ दैत्यांत प्रह्राद, ३८ गणना करणारांत काल, ३९ पशूमध्यें सिंह, ४० पक्ष्यांत गुरुड, ४१ वेगवानांत वायु, ४२ शस्त्रधार्यांत राम, ४३मत्स्यामध्यें नक्र, ४४ नद्यांत भागीरथी, ४५ विद्यांमध्यें अध्यात्मविद्या, ४६ वाद करणार्यांचा युक्तिवाद, ४७ अक्षरांत अकार, ४८ समासांत द्वंद्व, ४९ अक्षय काल आणि सर्वतोमुखी सर्वांचा आधार, ५० संहार करणारा मृत्यु, ५१ पुढें उत्पन्न होणार्या प्राण्यांचें उत्पत्तिकारण, ५२ स्त्रियांत कीर्तिनित्य नवी अशी, ५३ लक्ष्मी - धन औदार्यासह, ५४ वाणी - विवेक असलेली, ५५ स्मृति, ५६ मेधा, ५७ धृति, ५८ क्षमा, ५९ सामांत बृहत्साम, ६० छंदांत गायत्री ६१ मासांत मार्गशीर्ष, ६ २ ऋतूंत वसंत, ६३ छळ करणार्यांचे द्यूत, ६४ तेजस्व्यांचे तेज, ६५ व्यवसायांत जय, ६६ सत्त्वशीलांचे सत्त्व, ६७ यादवांमध्यें वासुदेव, ६८ पांडवांत अर्जुन, ६९ मुनीमध्यें व्यास, ७० कवींत शुक्राचार्य, ७१ शासन करणार्यांचा दंड, ७२ विजयेच्छूंची नीति, ७३ गुह्य गोष्टींतील मौन, ७४ ज्ञान्यांचें ज्ञान आणि ७५ सर्व भूतमात्रांचें बीजरूप. ऐशियाही सात पांच या प्रधाना। विभूति सांगितलिया तुज अर्जूना ॥ तो हा उद्देश जो गा मना। आहाच गमला ( [ज्ञा. १०-३०२]) पाषाणामाजी रत्न। धातूंमाजी कांचन। वस्त्रांमाजी तें जाण। देवांग तें मी ॥ तृणामाजी दर्मू वीरा। धारांमाजी मेघधारा। ऐसिया विभूती अपारा। जाण प्रकारें येणें ॥ (गीतार्णव अ. ३०)
|