Dictionaries | References ल लष्कर Script: Devanagari See also: लशकर , लश्कर , लषकर , लस्कर Meaning Related Words लष्कर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दल , पलटण , फौज , वाहिनी , सैन्य . लष्कर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सैन्य जेथे राहते ती जागा Ex. मी अत्ताच लष्करात जातो आणि एक पेटारा घेऊन येतो noun एखाद्या देशातील सैनिक दल Ex. स्वयंचलित रायफल ही जगभरातील लष्करांची पहिली पसंती ठरली आहे. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujમિલિટરી hinमिलिटरी kasمِلِٹرٛی , فوج kokमिलिटरी oriମିଲେଟ୍ରୀ urdملٹری , فوج See : सैन्य लष्कर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. सैन्य ; फौज .सैन्य जेथे राहते तो भाग ; कँप ; गोट . - पु . नाखवा ; खलाशी ; किंवा लष्करांतील नोकर ; लास्कर . [ फा . लश्कर ] ( वाप्र . ) लष्करच्या भाकरी भाजणे - निष्कारण दुसर्याच्या उठाठेवी करणे ( पूर्वी सैन्य एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाई तेंव्हा त्या त्या ठिकाणीच्या लोकांना शिपायांच्या भाकरी भाजण्यासाठी लावीत ह्यावरुन हा वाक्प्रचार निघाला आहे ). पत्र धाडणारा खरोखरच जानकीबाईंच्या कळवळ्याचा होता की ... लष्करच्या भाकरी भाजणारा होता ? - रंगराव . लशकरगिरी , लश्करगिरी , लष्करगिरी - स्त्री .सैन्यांतील चाकरी ; शिपाईगिरी ; स्वारीवर जाणे .( उपजीविकेकरितां ) लष्कराबरोबर जाणे ; लष्करांतील वाणी , शिंपी इ० चा धंदा .०भरती स्त्री. सैन्यांत नवीन उमेदवार भरणे ; ( इं . ) रिक्रूटिंग . लष्करभरतीची चळवळ निघाली तेव्हां सरकार पक्षपाती प्रोफेसरांनी त्यांचे अभ्यास बुडविले . - केले १ . ३१७ . लशकरी , लषकरी लश्करी , लष्करी वि . सैन्यासंबंधी .०कायदा पु. युद्धामुळे किंवा बंडाळीमुळे नेहमीचा असलेला कायदा तहकूब होऊन लष्करी अधिकार्यांचा बसलेला अंमल व त्यांचा कायदा ; ( इं . ) मार्शल लॉ .०पिवळा - पु . मोठ्या दाण्याचा पिवळा व चमकदार गहू . - मुंव्या ४३ .गहूं - पु . मोठ्या दाण्याचा पिवळा व चमकदार गहू . - मुंव्या ४३ .०बैदा पु. वाहून नेण्यासारखे लष्करी सामान ; बाजारबुणगे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP