|
पु. ( बे . ) ताप . पु. पु. गुरुत्व ; जडपणा . ज्या योगानें पदार्थ निराधार असतां खालीं येतो तो पदार्थाचा धर्मविशेष . ( गो . ) अवसर ; संचार ( पिशाच्चाचा ). ( क्रि० काढणें ). मंत्राचा प्रयोग , विनियोग . ( क्रि० टाकणें ; घालणें ; फुंकणें ; लागू होणें ). [ भारणें ] वजन तोलून काढलेलें परिमाण . कोणतीहि वजनदार वस्तु ; दाब ; दडपण कागद वार्यानें उडतात त्यावर कांहीं भार ठेव . ०दोरी स्त्री. गर्भ गलित न व्हावा म्हणून काहीं स्त्रिया कमरेला बांधतात ती भारलेली दोरी . ( सामा . ) भारलेली दोरी ; गंडा . बाधें कृपादृष्टिचि भारदोरी । - भाए ७७५ . - दा १४ . १० . ८ . [ भारणें + दोरी ] ( ल . ) ( काम , उपकार , मेहेरबानी इ० चें ) वजन ; ओझें . तो भारु फेडावेआ जगन्नाथा । अवतरलासी तूं । - शिशु १४७ . ( ल . ) ओझ्याप्रमाणें मानलेलें काम ; दयेचें कृत्य ; उपकार . ( ल . ) महत्त्व ; गौरव ; धन्यता ; वजन शैत्यादि विकारामुळें डोक्यास भासणारा जडपणा . आज माझे मस्तकास भार पडला आहे . एक रुपयाच्या वजनाइतकें वजन ; एक तोळा वजन . ही वाटी पंचवीस भार आहे . ( समासांत पदलोप होऊन ) विशिष्ट वजन . पैसाभार लोणी , ढबूभार साखर , वीस रुपये भार गूळ . ओझें ; वजन उदा० काष्ठ - तृण - पर्ण - भार . सोनसाखळीचा झाला भार । - मसाप २ . १ ( सैन्याचें एक अंग म्हणून ) संख्याबल . जसें - अश्वभार , कुंजरभार , दळभार , रथभार इ० . ( काव्य ) कळप ; तांडा ; समूह वाटेसि गडगडतां व्याघ्र । थोकती जैसे अजाचे भार । समूह ; समुदाय ; मेळा ; गर्दी . उदा० गोभार , द्विजभार , भृत्यभार इ० . आशीर्वचनीं जयजयकार । करुनि बैसला ऋषींचा भार । - मुआदि १६ . ११० . सेना ; समूह . दळव्याचा भार कुग्डूंच्या मैदानीं गेला । - ऐपो ६८ . भर ; बहर मग हें रसभावफुलीं फुलैल । नानार्थ फळभारें फळा येईल । - ज्ञा ११ . २० . नम्र होती फळभारें तरुवर सारे - शाकुंतल ओझें ; काळजी ; जबाबदारी ; आधार . सखे , मी सर्व भार परमेश्वरावर ठेविलेला आहे . - रत्न २ . १ . व्यूह ; बेत . ते पाहोन राजभुवरानें लष्कर पायदळ फौज करुन भार रचिले . - इमं ९ . आठ हजार तोळे वजन . ( चार तोळे = १ पल : १००पला = १ तुला ; २० तुला = १ भार . रत्नें प्रस्थ भार एक एक कनक । ऐसी दक्षिणा आरंभीं । - जै १ . ९१ . - वि . जड . मत्प्रश्न भार कां गमला ? - मोअश्व २ . ३० . [ सं . भार ; फा . बार ] ०कस न. गाड्यावर किंवा उंट , हत्ती इ० च्या पाठीवर सामान कसून बांधण्याचा सोल दोर . वादळांत तंबू डळमळूं नये म्हणून त्याच्यावरुन टाकून जमिनीस खिळविलेली दोरी . [ तुल० फा . बारकश ] ०ग्रस्त पीडित भाराकुल भाराक्रांत भारान्वित भारार्त - वि . ( शब्दशः व ल . ) ओझ्यानें पीडिलेला , त्रासलेला . ०दडीचा वि. वजनदार ; भारदस्त . ०दर्शक वि. वजन दाखविणारें ( परिमाण ). उदा० मण , पौंड , तोळा , मासा इ० . ०दस्त दस्ती दास्त दार - वि . वजनदार ; महत्त्वाचा . बहुमोलाचा ; मूल्यवान . [ भार + फा . दस्त इ० ] दस्ती , दारी - स्त्री . वजन ; महत्व . हुकमत चालविण्याचें सामर्थ्य , अधिकार , सत्ता . भारंदाज - वि . वजनदार ; फायदेशीर ; भरभराटीचा ( माणूस , धंदा ). [ फा . बार + अंदाज ] भारंदाजी - स्त्री . सार ; महत्त्व ; भरीवपणा ; फायदेशीरपणा ( मनुष्य , काम इ० चा ). ०दार वि. निष्णात ; प्रवीण ; वाकबगार ; महत्त्वाचें काम करावयाला जबाबदारी घेण्याला लायक , समर्थ . [ हिं . ] ०दारी वि. ओझें वाहणारा ; ओझ्याचा . जरुरियात प्रसंगीं भारदारी गाडे लागल्यास ... - राजमहाल कामगारी कारकुनांच्या कर्तव्यासंबंधीं नियम पृ . ६ . धडी स्त्री . जड वस्तु ; भारी सामान . भारधडी झाडून गेली परंतु वस्तीस मनुष्यें होतीं . - भाब ३० . गैरलढाऊ लोक . मल्हारराव यांचीं मुलेंमाणसे भारधडी इंदुरास राहिली . - भाब ९६ . ०बरदारी बारदारी - क्रिवि . लवाजम्यासह . औरंगाबादेहून देखील भारबारदारी दिल्लींस जात आहेत . - शाछ १ . २७ . [ भार + बरदार = वाहक ] भारंभार - वि . सारख्या वजनाचें ; भारोभार . हे रुपये द्यावे आणि भारंभार चांदी घ्यावी . [ भार + आणि + भार ] ०भूत वि. जड ; भार झालेला . भारभूत होय जिणें ... । - विक ८२ . ( ल . ) निरुपयोगी ; निरर्थक . ०मान न. गुरुत्व ; जडपणा . याच्या उलट आकारमान . हवेचा दाब मोजण्याचें यंत्र ; भारमापक यंत्र . ( इं . ) बॅरोमीटर . ०वाहक वि ओझें वाहणारा ( मनुष्य , गाडी , जनावर इ० ) कीं आले खर , भारवाहक असे पोटीं मनुष्याकृती । - विक १२ . ( संसार , कामधंदा इ० चा ) भार , जबाबदारी सहन करणारा . अंगीं असलेल्या विद्यादि गुणांचा - द्रव्य मिळविणें इ० कामीं उपयोग न करणारा ( माणूस ); ओझ्याचा बैल . ०शांखळ ळा - स्त्री . ( महानु . ) शृंखला . तो जुझारां गडे । पाईं भारशांखळ काढे । - भाए ३५९ . [ भार + शृंखला ] भारोभार - क्रिवि . सारख्या वजनाचें ; भारंभार . [ भार द्वि . ] भारकी कें - स्त्रीन ( काटक्या , गवत , पानें इ० चा ) लहान भारा , ओझें . [ भारा अल्प . ]
|