Dictionaries | References

माचा

   
Script: Devanagari
See also:  माचवा , माचावा

माचा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  बड़ी मचिया   Ex. शीला ने बच्चे को माचे पर सुला दिया
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

माचा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bedstead or cot.

माचा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A bedstead or cot.

माचा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चार खांबांवर उभारलेली, शेताच्या राखणीसाठी केलेली बसण्याची जागा   Ex. माचावर बसलेला शेतकरी जनावराची आवाज एकून उठला.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  मोठी माच   Ex. शीलाने मुलाला माचावर झोपवले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : पलंग

माचा

  पु. 
   काथ्यानें विणलेला एक विशिष्ट आकाराचा पलंग . गणिले कुशशयनोनचि कृष्णेनें हे पलंग हे माचे । - मोआदि ३४ . २३ .
   पलंग ; मंचक . दूत त्रासासि घेतीं म्हणुनि सुमति ते जोडिती पाय माचे । - मोकृष्ण ७२ . ५३ .
   शेताच्या राखणीसाठीं चार खांबावर केलेली बसण्याची जागा ; माळा .
   माच्याचा खूर .
   पाण्याचा पाट ओलांडून पलीकडे जाण्यासाठीं केलेली वाट . गांवच्या माच्यापाशीं गाडी आली . - खरादे . [ सं . मंचक ; प्रा . मंचओ ; अपं . मंचऊ ] माचाड - स्त्री . मोटेनें पाणी वर काढण्याकरितां जिला मोटेचा नाडा ( दोर ) बांधतात ती मोटेच्या तोंडावरील लाकडी चौकट . माचाळ - न . माचा अर्थ ३ पहा . माची - स्त्री .
   पर्वताच्या पायथ्याजवळील किंवा पायथाशिखर यांच्या मधील सपाट जमीन ; उपत्यका .
   किल्ल्याच्या तटाखालील उताराचा माग .
   माचा ; खाट .
   ( व . ) खुर्चीसारखे समोर खालीं पाय सोडून बसण्याचा छोटा छकडा .
   चार खुंटावर आडवीं उभीं लाकडें ठेवून केलेली चवकट . ( उन्हांत धान्य इ० वाळत घालण्यासाठीं , पेंढा ठेवण्यासाठीं ).
   वासरें , करडें इ० कांकरितां खुंट व फळ्या पुरुन ( केलेलें आवार ; कोंड वाडा ; कोंडण . [ सं . मच = धारण करणें ; मंच ] माचुंडा , माचोंडा , माचोडा - पु . ( कों . ) ( भात , नाचणी इ० कांच्या ) पेंढ्यांचा बिडा ; पेंढी . माचो - पु . ( कु . ) दोर्‍यांनीं विणलेला पलंग , चोपाळा . माचोळी , माचुळी - स्त्री .
   पेटी , धान्याचें गोण इ० ठेवण्याची घडवंची .
   लहानसा माच ; माळोंचा ; गवत , पेंढें इ० साठीं केलेली उंच जागा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP