|
उ.क्रि. १ ग्रथन करणें ; गुंफणें ; तंतु वगैरे एकमेकांत गुंतवून वस्त्रादि तयार करणें . २ पलंग , माचा , खाट इत्यादि नवार , सुंभ , दोरी वगैरेनीं जाळीसारखें काम करून भरणें ; गुंफणें . ३ टोपली , चटई , वेणी वगैरे गुंफणें ; तंतु , दोरे , पेड एकत्र ग्रथन करणें . कर्पूरकर्दळीचें हिंदोळें । मृणाळसुताचेनि पाटें विणिलें । - शिशु ७७४ . ४ तुणणें ; दोरा भरणें ; जाळीकाम करणें . [ सं . वे ; सिं . उणणुं ; गो . विणय ] विणकर - स्त्री . वीण ; पोत ; विणण्याची तर्हा ; सफाई . [ विणणें ] विणकर , विणकरी - पु . विणणारा ; कोष्टी ; साळी . विणकाम - न . विणण्याची कला ; कृति . विणणावळ - स्त्री . विणण्याची मजूरी . विणतर - स्त्री . ( बडोदें ) विणकाम ; जाळी ; वीण . एक विणतरीची टिपाई व खुर्च्या ठेवाव्या . - स्वारीनियम ७१ . विणाई - स्त्री . १ विणकर . विणावणी - स्त्री . वीण ; विणकर ; विणण्याचें कार्य . मगतिये विणावणीचेनि आधारें । लहाना चौकडिया पटत्व भरे । - ज्ञा ९ . १०७ . म्हणौनि अविद्येचिया विणावणी । ब्रह्मी पढति प्रपंच रंगाची वाणी । - माए ५८२ . विणीव - वि . १ विणलेलें . २ वेणी घातलेलें .
|