Dictionaries | References

१४

   { चौदा, चतुर्दश }
Script: Devanagari

१४

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : चौदह, चौदह

१४

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : चौदा, चौदा

१४

Sanket Kosh | Marathi  Marathi |   | 
चतुर्दशाक्षरी मंत्र (अर्वाचीन)   
(अ) अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त.
(आ)"स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे."(लो. टिळक).
चतुर्दश प्रयाग   
१ प्रयाग राज - गंगा - यमुना - सरस्वती,
२ देवप्रयाग - अलकनंदा - भागीरथी,
३ रुद्रप्रयाग - अलकनंदा - मंदाकिनी,
४ कर्णप्रयाग - पिंडारगंगा - अलकनंदा,
५ नंदप्रयाग - अलकनंदा - नंदा,
६ विष्णुप्रयाग - विष्णुगंगा - अलकनंदा,
७ सूर्यप्रयाग - अलसतरंगिणी - मंदाकिनी,
१० भास्कप्रयाग - भटवारी,
११ हरिप्रयाग - हरिगंगा - भागीरथी,
१२ श्यामप्रयाग - श्यामगंगा - भागीरथी,
१३ गुप्तप्रयाग - नीलगंगा - भागीरथी व
१४ केशवप्रयाग - अलकनंद - सरस्वती. ([कल्याण तीर्थांक])
चतुर्दश भुवनें   
१ अतल, २ वितल, ३ सुतल, ४ तलातल, ५ रसातल, ६ महातल, व ७ पाताळ असे सात अधोलोक आणि आपण सर्व वास करतो तो ८ भूलोक ; त्यावर ९ भुवर्लोक, १० स्वर्लोक, ११ महर्लोक, १२ जनलोक, १३ तपोलोक व १४ सत्यलोक असे ऊर्ध्व लोक आहेत.
हीं चतुर्दश भुवनें होत. (वेदांत विचार दर्शन)
चतुर्दशांगलोह   
१ रास्ना, २ कापूर, ३ तालीस पत्र, ४ ब्राम्ही, ५ शिलाजित, ६ सुंठ, ७ मिरी, ८ पिंपळी, ९ हिरडा, १० वेहडा, ११ आवळकठी, १२ नागर मोथे, १३ वावडिंग व १४ चित्रकमूळ हीं चौदा औधधें आणि लोहभस्म.
चौदा अंगें (चर्चेचीं)   
१ संशय, २ प्रयोजन, ३ द्दष्टांत, ४ सिद्धांत, ५ अवयव, ६ तर्क, ७ निर्णय, ८ वाद, ९ जल्प, १० वितंडा, ११ हेत्वाभास, १२ छल, १३ जाति व १४ विग्रहस्थान, हीं चचेंचीं चौदा अंगें अथवा विषय न्यायदर्शनांत मानले आहेत.
चौदा अंगें (शरीराचीं)   
१ दोन मिंवया, २ दोन नाकपुडया, ३ दान डोळे, ४ दोन कान ; ५ दोन ओंठ, ६ दोन कोंपरे, (हाताचे) ७ दोन मनगटें, ८ दोन गुडघे, ९ दोन घोटे, १० दोन ढोपर, ११ दोन पाय, १२ दोन हात, १३ दोन खांदे आणि १४ दोन गाल हीं प्रत्येकीं दोन दोन अशीं चौदा अंगें आहेत. ([वा. रा. सुंदर, ३५-१९])
चौदा अंगें (ज्ञानाचीं)   
१ सत्, २ चित, ३ आनंद, ४ अस्ति, ५ भाति, ६ प्रिय, ७ रूप, ८ नाम, ९ आत्मा, १० ब्रह्म, ११ अनंत, १२ तत् १३ त्वम् व १४ असि.
चौदा अद्वैतमतप्रतिपादक प्रमुख ग्रंथ   
१ शारीरकमाष्य, २ पंचपादिका, ३ बृहदारण्याभाष्यावरील वार्तिक, ४ नैष्कर्म्यसिद्धि, ५ भामती, ६ संक्षेपशारीरक, ७ खंडनखंडखाद्य, ८ पंचदशी, ९ वेदांतसार, १० वेदांतपरिभाषा, ११ सिद्धान्तलेश, १२ सिद्धांतबिंदु, १३ अद्वैतसिद्धि आणि १४ अद्वैतामोद.
"चतुर्दशात्र रत्नानि शाङ्‌‍करे स्युर्मतार्णवे"([ब्र. सूत्र, भाष्यप्रस्तावना])
चौदा अन्नामध्यें सांपडणारीं पोषक द्र्व्यें   
१ सोडियम्, २ पोटॅशियम्, ३ कॅल्‌‍शियम्, ४ मॅग्नेशियम्, ५ लोह, ६ ताम्र, ७ मँगनीझ, ८ जस्त, ९ क्लोरीन, १० ब्रोमीन, ११ आयोडिन, १२ फ्लोरीन, १३ फॉस्फरस आणि १४ गंधक, (Modern Diatory Treatment)
चौदा इंद्र   
१ यश, २ रोचन, ३ सत्यजित, ४ त्रिशिख, ५ विभु, ६ मंत्रद्रुम, ७ पुरंदर, ८ बलि, ९ अद्‌‍भुत, १० भारद्वाज, ११ वत्स, १२ वासिष्ठ, १३ विष्णुवृद्ध व १४ शांडिल्य ([म. वा. को.])
चौदा इंद्रियांच्या चौदा देवता   
१ अंतःकरण - महाविष्णु, २ अहंकार - रुद्र, ३ मन - चंद्रमा, ४ बुद्धि - ब्रह्मा, ५ कान - दिशा, ६ त्वचा - वायु, ७ नेत्र - सूर्य, ८ जीभ - वरुण, ९ नाक - अश्चिनीकुमार, १० मुख - अग्नि, ११ हात - इंद्र, १२ पाय - उपेंद्र ([वामन]), १३ लिंग - प्रजापति व १४ गुद - यम. ([पंचग्रंथी]).
चौदा इंद्रियांचे चौदा विषय   
पंच ज्ञानेंद्रियें - १ श्रोत्र - शब्द, २ त्वाच - स्पर्श, ३ चक्षु - रूप, ४ जिह्ला - रस, ५ घ्रान - गंध ; पंच - कर्मेद्वियें, ६ वाक् - वचन, ७ पाणि - आदान, ८ पाद - गमन, ९ उपस्थ - रतिमोग १० गुद - मलत्याग ; चार अंतःकरणें, ११ मन - संकल्पविकल्प, १२ बुद्धि - निश्चय, १३ चित्त - चिंतन व १४ अहंकार - अहंपणा, (विचारचंद्रोदयदर्शन)
चौदा कामिनी   
१ शांति, २ क्षमा, ३ दया, ४ उन्मनी, ५ उपरति, ६ सद्धिद्या, ७ तितिक्षा, ८ स्वरूपस्थिति, ९ मुमुक्षा, १० निष्कामना,
११ प्रतीति, १२ सुलीनता, १३ समाधि व १४ निर्वाणदीक्षा, ([हरिविजय])
चौदा कुलमातृका   
१ गौरी, २ पद्मा, ३ शची, ४ मेघा ५ सावित्री, ६ विजया, ७ जया, ८ देवसेना, ९ स्वधा, १० स्वाहा, ११ मातर, १२ धृति, १३ पुष्टि व १४ तुष्टि. (पुण्याहवाचन)
चौदा कुलें अप्सरांचीं   
१ ब्रह्मदेवाची मानससृष्टि, २ वेदापासून, ३ अग्नि, ४ वायु, ५ अमृतापासून, ६ जलापासून, ७ सूर्यकिरण, ८ चंद्र - किरण, ९ पृथ्वी, १० विद्युत, ११ मृत्यु, १२ मदन, १३ मुनि आणि प्रजापतिकन्या यांपासून व १४ अरिष्टा. यांपासून झालेलीं हीं चौदा अप्सरकुलें होत. (बाणभट्ट कादंबरी)
चौदा गुण महत्त्वाचे   
१ देशकालज्ञता, २ दाढर्य - बळकटपणा, ३ सर्वक्लेशसहिष्णुता, ४ सर्वज्ञता, ५ दक्षता, ६ बल, ७ गुप्तमसलत, ८ मागल्यापुढल्या स्वतःच्या वर्तनाचा मेळ, ९ शौर्य, १० भक्तिज्ञच, ११ कृतज्ञता, १२ शरणागतावर दया, १३ क्रोधराहित्य व १४ स्थैर्य, हे गुण महत्त्वाचे मानले आहेत. वालिपुत्र अंगद हा या चौदा गुणांनीं संपन्न होता. ([वा. रा. किष्किंधा सर्ग, ५४])
चौदा जागतिक आश्चर्यें   
१ विनतारी तारायंत्र, टेलिफोन, २ रेडिओ टेलिव्हिजन व बोलपत, ३ विमान, ४ क्ष - किरणें आणि अल्ट्रा व्हॉयोलेट किरणें, ५ स्पेक्ट्र्म अनॉलिक्सिस, ६ रेडियमचा शोध, ७ ऑटोमोबाईल आणि लोकोमोटिव्ह, ८ रॉकेटपॉपल्‌‍शन, ९ जेट पॉप्ल्‌‍शन, १० पेनसिलीन आणि स्ट्रेप्टो मायसीन, ११ इतर ऍन्टिबॉयाटिक्स, १२ राडरचा शोध, १३ इन्टकॉनिनेंटल बॅलिस्टिक् ‌, १३ मिसिलिज, व १४ ऑटम बाँब, हैड्रोजन बाँब व पृथ्वीचे उपग्रह. ([Bharat year 1960])
चौदा टाळकरी (तुकारामाचे)   
१ निळोबाराय, २ रामेश्वरभट, ३ गंगाराम मवाळ, ४ महादजी कुलकर्णी, ५ कोंडोपंत लोहकरे, ६ मालजी गाडे, ७ गवरशेट वाणी, ८ मल्हारपत कुळकर्णी, ९ अंबाजीपंत लोहगांवकर, १० कान्होबा, ११ संताजी जगनाडे, १२ कोड पाटील, १३ नावजी माळी व १४ शिववा कासार. (तुकारामचरित्र)
चौदा तंतु वाद्यें   
१ वीणा, २ बीन, ३ रुद्रवीणा, ४ एकतारी, ५ सारंगी, ६ सतार, ७ सारमंडळ, ८ तंबूरी, ९ सरोद, १० कोका, ११ रखब, १२ मदनमंडळ, १३ ताउस व १४ तुणतुणें, ([म. श. को.])
चौदा दानें   
१ अन्नदान, २ उदकपान, ३ दीपदान, ४ तांबूलदान, ५ कमंडलुदान, ६ चर्मी जोडादान, ७ छत्रीदान, ८ काठीदान, ९ वस्त्रदान, १० लोहदंडदान, ११ शेगडीदान, १२ तिळदान, १३ चंदनदान आणि १४ पुष्पदान, असे चौदा प्रकार.
चौदा देवनक्षत्रें   
१ कृत्तिका, २ रोहिणी, ३ मृग, ४ आर्द्रा, ५ पुर्नवसु, ६ पुष्य, ७ आश्लेषा, ८ मघा, १० उत्तरा, ११ हस्त, १२ चित्रा, १३ स्वाति व १४ विशाखा. ([तै. ब्रा.])
चौदा दोष (गायनाचे)   
१ शंकित, २ भीषण, ३ भीत, ४ उदूदुष्ट, ५ आनुनासिक, ६ काकस्वर, ७ मूर्द्धगत, ८ स्थान - विवर्जित, ९ विस्वर, १० विरस, ११ विश्लिष्ट, १२ विषमाहत, १३ व्याकुल व १४ तालहीन.
"व्याकुलं तालहीनंज तालहीनं च गीतिदोषाश्चतुर्दश"([बृहन्नादीय - पूर्वखंड. ५०-४५])
चौदा दोष (राज्यशासकांस)   
१ नास्तिकता - ईश्वर व धर्म नाहीं असें मानणें, २ अनृत, ३ क्रोध, ४ प्रमाद (लक्ष न ठेवणें), ५ दीर्घसूत्रता (चेंगटपणा), ६ तज्ज्ञांचा सल्ला न घेणें, ७ आळस, ८ इंद्रियसुखाविषयीं आसक्ति, ९ अनावर द्रव्यलोभ. १० मूर्खांशीं मसलत, ११ निश्चय करून तें न करणें, १२ गुप्तता न राखणें, १३ उत्सव वगैरे न करणें व १४ एकाच वेळींज अनेकांशीं शत्रुत्व करणें. ([म. भा. सभा. ५-११२])
चौदा नांवें चांगदेवाचीं   
चांगदेव एक महायोगी होते. योग सामर्थ्थानें दर शंभर वर्षांनीं जुना देह टाकून नवा देह धारण केल्यावेळीं घेतलेलीं निरनिराळें चौदा नांवें :- १ चांगदेव, २ वटेश्वर चांगा, ३ चक्रपाणी, ४ चांगासिद्ध, ५ शिवयोगी चांगा, ६ मणी सिद्धचांगा, ७ अनकर चांगा, ८ नाहमा, ९ नागेश, १० मुघेश, १११ सत्यसिद्ध चांगा, १२ निश्चलदास, १३ चिंधादवीचांगा व १४ वुटीचांगा (निळोवाचा नाथा)
चौदा नांवें चित्रगुप्ताचीं   
१ यम, २ धर्मराज, ३ मृत्यु, ४ अन्तक, ५ वैवस्वत, ६ काल, ७ सर्वभूतक्षय, ८ औदुम्बर, ९ दघ्नाय, १० नील, ११ परमोष्ठिन्, १२ वृकोदर, १३ चित्र आणि १४ चित्रगुप्त ([क्षत्रियांचा इतिहास])
चौदा नांवें मूळमायेचीं   
१ चैतन्य, २ गुणसाम्य, ३ अर्धनारी - नटेश्वर, ४ षड्‌‍गणेश्वर, ५ प्रकृतिपुरुष, ६ शिवशक्ति, ७ शुद्धसत्त्व, ८ गुण - क्षोमिणी, ९ सत्त्व, १० रज, ११ तम, १२ मन, १३ माया आणि १४ अंतरास्मा.
मन माया अंतरात्मा। चौदा जीनसांची सीमा।
विद्यमान ज्ञानात्मा। इतुकें ठाई ([दा. बो. २०-५-१०])
चौदा पत्री (अनंत पूजेस)   
१ अपमार्ग, २ जाई, ३ मोगरा, ४ जास्वंद, ५ विष्णुक्रांत, ६ शतपत्र, ७ अश्चत्थ, ८ औदुंबर ९ आंबा, १० वड, ११ पारिजात, १२ करवीर, १३ आवळी व १४ केतकी,
चौदा परम भागवत (पुराणान्तर्गत)   
१ प्रह्लाद, २ नारद, ३ पराशर, ४ पुंडरीक, व्यास, ६ अंबरीष, ७ शुक्र, ८ शौनक, ९ भीष्म, १० दाल्भ्य, ११ अर्जुन, १२ रुक्मांगद, १३ वसिष्ठ व १४ विभीषण,
चौदा पार्षदगण श्रीविष्णूचे   
१ नंद, २ सुनंद, ३ बल, ४ प्रबल, ५ आर्हण, ६ विधाता, ७ जय, ८ विजय, ९ चंड, १० प्रचंड, ११ मद्र, १२ सुमद्र, १३ कुसुद व १४ कुमुदाक्ष,
चंड प्रचंड सुशीला मद्र सुमद्र, पुण्याशील।
कुमुद कुमुदाक्ष सकळ हा पार्षदमेळ श्रीहरीचा ॥ ([चतुः श्लोकी भागवत])
चौदा पुष्पें (अनंत पूजेस)   
१ पद्म, २ जाति, ३ चंपक, ४ कल्हार, ५ केतकी, ६ बकुळ. ७ शतपुष्प, ८ पुंनाग, ९ करवीर, १० धत्तुर, ११ कुंद, १२ मल्लिका, १३ मालती व १४ कर्णिका.
हीं चौदा पुष्पें अनंत पूजेस लागतात.
चौदा प्रकारचे जप   
१ नित्यजप, २ नैमित्तिक, जप, ३ कम्यजप, ४ निषिद्ध जप, ५ प्रायश्चित्त जय, ६ अचल जप, ७ चल जप, ८ वाचिक जप, ९ उपांशु जप, १० भ्रमर जप, ११ मानस जप, १२ अखंड जप, १३ अजपा जप, आणि १४ प्रदक्षिणा जप.
चौदा प्रकारचा भूतसमुदाय   
१ सिद्ध, २ गुह्मक, ३ गंधर्व, ४ यक्ष, ५ राक्षस, ६ सर्प, ७ विद्याधर, ८ पिशाच - या आठ देवयोनि आणि ९ सरीसृप, १० वानर, ११ पशुअ, १२ मृग (जंगली प्राणी) १३ पक्षी - या पांच तिर्यग् योनि व १४ मनुष्य योनि.
असा चौदा प्रकारचा भूतसमुदाय अथवा प्राणिमात्र होत. ([वि. पु. अंश ३])
चौदा प्रकार यज्ञाचे   
१ अग्निष्टोम, २ अत्यग्निष्टोअम, ३ उक्थ, ४ षोडशी, ५ वाजपेअय, ६ अतिरात्र, ७ आप्तोर्याम, ह्मा सात सोमसंस्था आणि ८ अग्निहोत्र, ९ दर्शपूर्णमास, १० आग्रयण, ११ पिण्डपितृयज्ञ, १२ चातुर्मास्य, १३ निरूढ पशुबंध आणि १४ सौत्रामणि.
अशा सात हवियज्ञ संस्था मिळून चौदा प्रकार होत.
चौदा प्रकार रुद्राक्षांचे   
एक ते चौदा मुखें असलेल्या रुद्राक्षांचीं चौदा नांवें क्रमानें :- १ शिव. २ देवदेवेश्वर, ३ अनल, ४ ब्रह्मा, ५ कालाग्निरुद्र, ६ कार्तिकेय, ७ अनङ्‌ग, ८ विनायक, ९ मैरव, १० नजार्दन, ११ रुद्र, १२ आदित्य, १३ विश्चेदेव व १४ परम - शिव.
(शिव. पु. विद्येश्वर संहिता अ. परम - शिव.
चौदा प्रकारच्या शालिग्राम शिला   
१ प्रलंबघ्न, २ पुंडरीक, ३ वैकुंठ, ४ मधुसूदन, ५ सुदर्शन, ६ नर ७ राम, ८ लक्ष्मीनारायण, ९ वीरनारायण, १० क्षीराव्धिशयन, ११ माधव, १२ हयग्रीव, १३ परमेष्ठी व १४ विष्वक्‌सेन.
असे एक चक्र असलेले शालिग्रामाचे चौदा प्रकार. माध्व संप्रदायांत शालिग्रामपूजनाचें विशेष महत्त्व मानलें आहे.
"विष्वक्‌सेनश्च विज्ञेयो एकचक्राश्चतुर्दश।"(द्वैतसिद्धान्त केसरी)
चौदा प्राकृत भाषा   
१ शौरसेनी, २ महाराष्ट्री, ३ मागवी, ४ अर्धमागधी, ५ प्राच्य किंवा गौडी, ६ अवन्तिका ७ दाक्षिणात्य ८ शाकरी, ९ बाल्हिकी, १० द्राविडी, ११ आभीरी, १२ चाण्डाली, १३ शाबरी व १४ पैशाची. ([भारतीय साम्राज्य])
चौदा प्रांत भाषा   
१ आसामी, २ बंगाली, ३ गुजराथी, ४ हिंदी, ५ कानडी, ६ काश्मिरी, ७ मल्याळी, ८ मराठी, ९ ओरिया, १० पंजाबी, ११ संस्कृत, १२ तामिळ, १३ तेलगु व १४ ऊर्दू.
या चौदा प्रमुख भाषा प्रांतभाषा म्हणून भारतीय घटनेनें मान्य केल्या आहेत. (हिंदी राज्यघटना) खेरीज साहित्य अकॅडमीनें इंग्रजी व सिंधी या दोन भाषांस कांहीं प्रमाणांत मान्य्ता दिली आहे.
चौदा प्रमुख नाडया   
१ सुषुम्ना, २ इडा, ३ पिंगला, ४ कुहु, ५ गांधारी, ६ हस्तिजिव्हा, ७ सरस्वती, ८ पूषा, ९ पयस्विनी, १० शंखिनी, ११ यशस्विनी, १२ करुणा, १५ विश्बोदरा आणि १४ अलम्बुषा. ([योगशास्त्र])
चौदा प्रमुख स्त्रोतसें (कलाघटित सूक्ष्म च्छिद्रावयव)   
१ प्राणवह २ उदकवह, ३ अन्नवह, ४ रसवह, ५ रक्तवह, ६ मांसवह, ७ मेदोवह, ८ अस्थिवह, ९ मज्जावह, १० शुक्रवह, १२ आर्तववह, १३ पुरीषवह, व १४ स्वेदवह,
शरीरांत उत्पन्न होणार्‍या असंख्य भावांचें उत्पादन व वहन करणार्‍या अंसख्य स्त्रोतसांत चौदा प्रमुख खोतसें शास्त्रकारांनीं वर्णिलीं आहेत.
चौदा बलें राज्यशासकांचीं   
(अ) १ देश, २ दुर्ग, ३ रथ, ४ हत्ती, ५ घोडे, ६ योद्धे, ७ राज्याधिकारी, ८ अंतःपुर, ९ अन्नव्यवस्था, १० अश्वरथादिकांचा पुरवठा, ११ नीति, १२ आयव्यय, १३ द्वव्य - पुरवठा आणि १४ गुप्तशत्रु,
हीं चौदा राज्यशासकांचें बलाबल अजमावण्याचीं स्थानें होत.
(आ) १ अंगबल, २ स्वतःचें शरीरबल. ३ सेनाबल, ४ कोशबल, ५ दुर्गबल, ६ कोटकिल्ले, ५ शक्तिबळ, ६ मंत्रबळ, ९-१०-११ वेदत्रयबळ ([आयुर्वेद, धनुर्वेद व गांधर्ववेद]) १२ बुद्धिबळ, १३ ब्राह्मणशेष सुकृतबळ आणि १४ अन्य राज्यांचें साह्मबळ ([मुक्तेश्वर समा. ३-१९ व ३८])
चौदा ब्रह्में   
१ शब्दब्रह्म, २ नित्येकाक्षरब्रह्म, ३ खंब्रह्म, ४ सर्वब्रह्म, ५ चौतन्यब्रह्म, ६ सत्ताब्रह्म, ७ साक्षिब्रह्म, ८ सगुणब्रह्म, ९ निर्गुणब्रह्म १० वाच्याब्रह्म, ११ अनुभवब्रह्म, १२ आनंदरब्रह्म, १३ तदाकारब्रह्म व १४ अनिर्वाच्यब्रह्म. ([दासबोध ७-३])
चौदा मनु   
१ स्वायंभुव, २ स्वारोचिष, ३ उत्तमननु, ४ तामसमनु, ५ रैवत, ६ चाक्षुष, ७ वैवस्वत, ८ सावर्णि, ९ दक्षसावर्णि, १० ब्रह्मा सावर्णि, ११ धर्मसावर्णि, १२ रुद्रसावर्णि, १३ देवसावर्णि व १४ इंद्रसावर्णि.
सृष्टिचक्रांत असलेली, कोकस्थिति कांहीं कालानें बिघडते व पुन्हां ती ताळ्यावर आणण्यासाठीं जुळबाजुळव होते. हा जो जुळवाजुळव होऊन मोडेपर्यंतचा काल त्यास मन्वन्तर म्हणतात.
त्या मन्वन्तराचा अधिपति तो मनु. असे चौदा मनु आहेत, अशी कल्पना आहे. ([भागवत स्कंध ८-१३])
चौदा मन्वन्तरें   
१ स्वायंभुव, २ स्वारोचिष, ३ उत्तम, ४ तामस, ५ रैवत, ६ चाक्षुष, ७ विवस्वत, ८ सावर्णी, ९ धर्म, १० सावर्णिक, ११ पिशंग, १२ अपिशंगाम, १३ शबल आणि १४ वर्णक.
ब्रह्मदेवाचें एक अहोरात्र म्हणजे कल्प, असे तीस कल्प सांगितले आहेत. एका कल्पांत चौदा मन्वन्तरें होतात.
सध्यां चालू असलेल्या वाराह कल्पांतल्या सातव्या मन्वन्तराचें नांव वैवस्वत आहे. ([लिंगपुराण अ. ७-२२-२३])
चौदा मन्वतरावतार   
१ यज्ञ, २ विभु, ३ सत्यसेन, ४ हरि, ५ वैकुंठ, ६ अजित, ७ वामन, ८ सार्वभौम, ९ ऋषभ, १० विष्वक्‌‍सेन, ११ धर्मसेतु, १२ सुदामा, १३ योगेश्वर व १४ बृहद्भानु. ([कल्याण - भक्ति - अंक])
चौदा माहेश्वरी सूत्रें   
१ अ इ उ ण्, २ ऋ लृ क्, ३ ए ओ ङ्, ४ ए ओ च् ‌, ५ ह य व र ट् ‌, ६ ल ण्, ७ ञ म ङ ण न म्, ८ झ भ ञ्, ९ घ ढ ध ष्, १० ज ब ग ड द श्, ११ ख फ छ ठ थ च ट त व्, १२ क प य्, १३ श ष स र् आणि १४ ह ल् ‌.
हीं मूळ सूत्रें पाणिनीनें अठ्ठावीस दिवस तप करून शंकराकडून मिळविलीं. (भ. प्रतिसर्ग ४-३०)
पाणिनीच्या कठोर तपामुळें भगवान् शंकरानें प्रसन्न होऊन ताण्डव नृत्य करीत असतांना जो डमरू वाजबिला त्यांतून निघालेल्या चौदा ध्वनि - नादामुळें हीं मूळ चौदा सूत्रें ध्वनिरूपानें निघालीं.
"नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नव पञ्चवारम् ॥ ' (नन्दिकेश्वर कारिका)
चौदा यज्ञ (गीतोक्त)   
१ ब्रह्मयज्ञ, २ द्र्व्यज्ञ, ३ देवयज्ञ, ४ ज्ञानेंद्रिययज्ञ, ५ विषययज्ञ, ६ स्वाध्याय - ज्ञानयज्ञ, ७ प्राणयज्ञ, ८ अपानयज्ञ, ९ प्राणापानयज्ञ, १० आंतरपानयज्ञ, ११ योगयज्ञ, १२ तपोयज्ञ, १३ जपयज्ञ व १४ इंद्रियप्रान - कर्मयज्ञ.
या सर्वांत जपयज्ञ महत्त्वाचा होय. ([भ. गी. अ. ४ श्लोक २४ ते ३३])
चौदा यमधर्म   
१ यम, २ धर्मराज, ३ मृत्यु, ४ अंतक, ५ वैवस्वत, ६ नील, ७ दध्न, ८ काल, ९ सर्वभूत, १० षरमेष्ठी, ११ वृकोदर १२ औदुंबर, १३ चित्र व १४ चित्रगुप्त. (तत्त्व - निज - बोध)
चौदा रत्नें   
(अ) देव आणि दानव यानीं समुद्र्मंथन करून चौदा रत्नें अथवा मूल्यवान् वस्तु काढल्या त्या - १ लक्ष्मी, २ कौस्तुभ, ३ पारिजातक, ४ सुरा, ५ धन्वंतरी, ६ चंद्र, ७ कामधेनु, ८ ऐरावत, ९ रंमा (आदि अप्सरी), १० उच्चैःश्रव नामक सप्तमुखी अश्व (हा श्चेतवर्ण व उन्नतकर्ण असा होता), ११ कालकूट विष, १२ शाङ्‌‍र्ग धनुष्य, १३ पांचजन्य शंख व १४ अमृत होय. पंधरावें रत्न - दाता.
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वतरिश्चंद्रमाः
गावः कामदुघाः सुरेश्वरगजो रम्मादिर्देवाङ्‌‍गनाः।
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्‌‍खोऽमृतं चांबुधेः
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्र्लम् ॥ (मंगलाष्टक)
(आ) प्रत्येक जातींतील श्रेष्ठं वस्तूला रत्न अशी संज्ञा आहे. अशी चौदा प्रकारचीं रन्तें पुराणांत वर्णिलीं आहेत तीं :- १ हत्ती, २ घोडा, ३ रथ, ४ स्त्री, ५ पुरुष, ६ कोश (धन), ७ पुषमाला, ८ वस्त्र, ९ वृक्षराजि, १० शक्ति, ११ पाश, १२ मणि, १३ छत्र व १४ विमान.
गजवाजिरथस्त्रीषु निधिमाल्यांवरद्रुमाः।
शक्तिः पाशं मणिं छत्रं विमानानि चतुर्दश ॥ ([सु.])
जातौ यदुत्कृष्टं तद्रत्नमभिधीयते। (मल्लिनाथ)
चौदा रत्नें वेदाब्धिमंथनांतून विघालेलीं   
१ विष - काम, २ मणि - अर्थ, ३ रंभा - नरकप्रदवेश्या, ४ वाजी - उच्चैःश्रवा (गमनशील सूर्य), ५ श्री - शक्ति, ६ वारुणी - अभिमान, ७ धन्वतरि - विष्णु, ८ शंख - मोक्ष, ९ धेन - धर्म, १० धनु - मर्न्य - युद्ध - संघंर्ष, ११ चंद्र - आल्हाद तत्त्व शिव, १२ कल्पवृक्ष - खर्ग (त्रिवर्गभोग), १३ गज ऐरावत - गणेश गजानन आणि १४ अमृत - कथा. ([कल्याण नोव्हेंबर १९६०])
चौदा रोगभेद   
१ सहजरोग, २ गर्मजरोग, ३ जातज्ञातरोग, ४ पीडाजनितरोग, ५ कालरोग, ६ प्रभावजरोग, ७ स्वभावजरोग, ८ देशजरोग ९ आगंतुकरोग, १० कायिकरोग, ११ आंतररोग, १२ कर्मजरोग, १३ दोषजरोग आणि १४ कर्मदोषजरोग. ([नूतनामृतसागर])
चौदा लाभ शिखा धारणानें प्राप्त होणारे   
१ निष्णातता, २ जीवनशक्तिन, ३ दीर्घायुष्य, ४ बल, ५ तेज, ६ अन्न, ७ धन, ८ सुमन, ९ द्दष्टि, १९ देवताप्रसाद, ११ यश, १२ प्रजननशक्ति, १३ सुप्रजा आणि १४ उत्तम वीर्य. (प्रेरणा शके १८७१ अंक २)
चौदा वाचा दोष   
१ पद्यांतील प्रयोग गद्यांत व गद्यांतील प्रयोग पद्यांत करणें, २ नाददोष, ३ क्रमदोष, ४ पददोष, ५ वाक्यदोष, ६ शक्तिदोष, ७ सामर्थ्यदोष, ८ गुणदोष, ९ प्रसाददोष, १० माधुर्य व ओजदोष, ११ अर्थदोष, १२ उपदेशदोष, १३ क्रियादोष व १४ अकांक्षा दोष. (चातुर्यचंद्रोदय)
चौदा विद्या   
(अ) १ ऋग्वेद, २ यजुर्वेद, ३ सामवेद, ४ अथर्ववेद हे चार वेद व १ छंद, २ शिक्षा ३ व्याकरण, ४ निरुक्त, ५ ज्योतिष व ६ कल्प - हीं सहा वेदांगें आणि १ न्याय, २ मीमांसा, ३ पुराणें व ४ धर्मशास्त्र - हीं सर्व मिळून चौदा विद्या होत.
अङ्‌गानि वेदाश्वत्वारी मीमांसा न्यायविस्तरः।
पुराणं धर्मशांस्त्र च विद्यास्त्वेता चतुर्दश ॥ (भ. ब्राह्म. २-६)
(आ) १ आत्मज्ञान, २ वेदपठण, ३ धनुर्विद्या, ४ लिहिणें, ५ गणित, ६ पोहणें, ७ विणणें, ८ शस्त्र धरणें, ९ वैद्यक, १० ज्योतिष, ११ रमलविद्या, १२ सूपशास्त्र, १३ गायन व १४ गारुड. (मूळ स्तंभ,)
(इ) १ ब्रह्मज्ञान, २ रसायन, ३ श्रुतिकथा, ४ विद्यक, ५ नाटय, ६ ज्योतिष, ७ व्याकरण, ८ धनुर्विद्या, ९ जलतरण, १० कामशास्त्र, ११ सामुद्रिकशास्त्र, १२ तन्त्रशास्त्र, १३ मंत्रशास्त्र आणि १४ परस्वहरण (चौर्य)
ब्रह्मज्ञानं रसायनं स्वरग्रं वैद्यं नटं ज्योतिषं।
व्याकरणं च धनुर्धरं जलतरं कामं च सामुद्रिकम्।
तन्त्रं मन्त्रं तथा परस्वहरणं एतं च चातुर्द्शम् ॥ ([सु.])
चालू युगांत जाहिरात ही पंधरावी विद्या आहे. (केळकर)
चौदा वेग मानव शरीरांतले   
१ अधो वायुवेग, २ रेचन (मल) वेग, ३ मूत्रवेग, ४ ढेकर, ५ शिंक, ६ तृषा, ७ क्षुधा, ८ निद्रा, ९ खोकला. १० श्रमजनित श्वासवेग, ११ जांभई, १२ अश्रुवेग, १३ वमन (ओकारी) आणि १४ कामवेग. या वेगांच अवरोअध केला असतां शरीरांत विकृति निर्माण होते. ([नूतनामृत सागर])
चौदा शिलाशासन लेख व विषय (अशोकाचे)   
१ अहिंसा, २ धार्मिक कृत्यें, ३ अधिकार्‍याची पंचवार्षिक फिरती, ४ धर्माचरण, ५ धर्म महासभा, ६ कामाचा उरक, ७ धार्मिक गुण, ८ धर्मयात्र, ९ मंगल समारंभ, १० यश व कीर्ति, ११ दानधर्म, १२ परमतसहिष्णुता, १३ धर्मविजय व १४ उपसंहार, असे चौदा महत्त्वाचे शिलाशासन लेख सर्व भारतांत अनेक ठिकाणीं आढळले असून त्यावरून भारताच्या प्राचीन इतिहासाची महत्त्वाची माहिती मिळते. ([म. ज्ञा. कोश. विभाग ७])
चौदा शुभयोग   
१ आनंद, २ प्रजापति, ३ सौम्य, ४ घ्वज, ५ श्रीवत्स, ६ छत्र, ७ मित्र, ८ मानस, ९ सिद्धि, १० शुभ, ११ अमृत, १२ मातंग, १३ स्थिर व १४ वर्धमान. हे चौदा संपूर्ण शुभयोग मानले आहेत. ([ज्योतिष])
चौदा शैव (वेदकालीन)   
१ दुर्वास, २ विश्वामित्र, ३ चतुरानन, ४ मार्कंडेय, ५ इंद्र, ६ बाणासुर, ७ नारायण, ८ कार्तिकेय, ९ दधिचि, १० श्रीराम, ११ कण्व, १२ भार्गव, १३ बृहस्पति व १४ गौतम. (दे. मा. अ. १)
चौदा समाधिस्थानें चांगदेवाचीं   
१ ब्रह्मगिरि, २ पुण्यस्तंभ, ३ नारायण डोह, ४ गिरनार, ५ निर्मळ, ६ प्रयाग, ७ निर्गुंद, ८ सेतुबंध, ९ जगन्नाथपुरी, १० मणिपुरी, ११ चंद्रगिरि, १२ शरय़ूतीर, १३ अविमुक्त क्षेत्र (वाराणशी) व १४ गोदातीरां पुणतांबें, चांगदेव महायोगी होतो.
दर शंभर वर्षांनीं योगसामर्थ्यांनें जुना देह टाकून नवा देह धारण करीत. अशा रीतीनें ते चवदाशें वर्षें जगले. शेवटची समाधि पुणतांबे येथें गोदातीरीं आहे.
चौदा सहजप्रवृत्ति व त्यांच्या जोडीनें प्रगट होणार्‍या भावना   
१ विमोचन प्रवृत्ति - भीति, २ युद्ध प्रवृत्ति - राग, ३ जुगुप्सा प्रवृत्ति - तिटकारा, ४ वात्सल्य प्रवृत्ति - मृदुभाव, ५ याचना प्रवृत्ति - आर्तभाव, ६ संभोग, प्रवृत्ति - कामभाव, ७ आत्मसमर्पण प्रवृत्ति - हीनभाव, ८ जिज्ञासा प्रवृत्ति - आश्वर्य, ९ आत्मविधान प्रवृत्ति - अहंभाव, १० संध प्रवृत्ति - एकाकी भाव, ११ अन्नसंशोधन प्रवृत्ति - क्षुधा, १२ निर्माण प्रवृत्ति - कर्तृभाव, १३ संपादन प्रवृत्ति - स्वाम्यभाव व १३ हास्य प्रवृत्ति - विनोदभाव, (मानसशास्त्र - प्रवेश)
चौदा हेर प्राणिमात्रांच्या वर्तनावर देखरेख करणारे   
१ सूर्य, २ चंद्र, ३ बायु, ४ अग्नि, ५ आकाश, ६ भूमि, ७ जल, ८ अंतःकरण, ९ यम, १० दिवस ११ रात्र, १२ सूर्योदय व १३ सूर्यास्त समयींचे संधिकाल आणि १४ धर्म.
आदित्यचंद्रावनिलोऽनलश्च द्यौर्मूमिरापो ह्र्दयं यमश्च।
अहश्व रात्रिश्च उभे च संध्ये धर्मो हि जानाति नरस्य वृत्तम‌६ ([म. भा. आदि. ७४-३०])
चौदा प्राचीन निरुक्त ग्रंथकार   
१ आग्रायण, २ औपमन्यव, ३ औदुम्बरायण, ४ और्णवाम, ५ काथक्य, ६ क्रौष्टकि, ७ गार्ग्य, ८ गालव, ९ तैटीकि, १० वार्षायणि, ११ शाकपूणि, १२ स्थौलाष्ठीवि, १३ शतबलाक्ष आणि १४ यास्क. निरुक्तं चतुर्दश प्रमेदम्‌ (दुर्गवृत्ति १-१३)

Related Words

१४   14   fourteen   xiv   कडेकरी   कफबदोज   नेनणे   कुरें   दाबोटा साखर   छोटा चक्कर   लागा   पोटांत सांठवणे   procaryote   आठौ   आणोजें   कान्हाडी   उत्छाह   किळावा   किळावो   घावघवित   संगरात   वेहंकळी   वोषद   अठसटि   अठसठ   अहंकारणें   आकारी   गैराद   दस्त करणें   टाहकळी   लाडू खायला घालणें   रेवंणा   रेवण्णा   भीड वागविणें   मोहोट   पेंडसा घेणें   सुहावा   हासिया   माल्हातणें   आब्रह्मस्तंभपर्यंत   आव्हाटचक्र   खाणीव   खिचट   खिचटें   खुडीव   खुतखावणी   कशास   काकीमुख   कार्गरी   उन्मळण   उपरिप्रवाहीचक्र   ईडेपिडे घेणें   उखरवा   उतरा   कउल   कल्हातणें   एकतया   एहीं   कोणेक   कोरवडे   कुंभणें   अंघ्र   अंघ्री   अंबुट   गोवृषध्वज   गोसी   गौसी   घणावणें   वाटीगर   विरंणा   विरण्णा   शेंदाडे   श्रोवणी   संवतुकी   वोहिनी   अहिर्णेसी   आगियाळें   अरवाल   अवशात्   गुप्तगोई   गोंगाणी   झराट   थिरथिरां   दनुपुत्र   चापेल   तीर्णक   तुकवा   टेंकी   टेंकुली   ठाकत   डांकुली   बलम   बसांत आणणें   बागे   बीवळ   भांती   माजु   मीत्री   येमाई देवी   मढेंरू   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP