Dictionaries | References

भडकणें

   
Script: Devanagari

भडकणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To roam, rove, wander.

भडकणें

 अ.क्रि.  
   भडाडणें ; भयंकर रीतीनें वर जाणेंपसरणें ; मोठ्या जोरानें पेटणें ( ज्वाळा ); जोरानें उठणें ( वारा ).
   चोंहोकडे पसरणें ( प्रकाश , वास ).
   भग्न होणें ; पांगणें ( सैन्य ).
   बुजणें ; बेबंद पळणें ( पशु ); बुजून दूध देईनासें होणें ( दुभतें गुरुं ).
   मोकळें सुटून येथेच्छ वागणें ; आज्ञाभंग करणें ; बावचळणें .
   फार रागावणें .
   भलतीकडे उडून जाणें ( निरोप नेणारें कबूतर )
   सुटणें अर्थ ३ पहा .
   भटकणें ; हिंडणें ; फिरणें ; भटक्या मारणें . [ ध्व . भड ! ] भडकणी - स्त्री . भडाडणें ; उधळणें ; पेट , आग पसरत जाणें . भडकतेल - न . खरजेस लावावयाचें एक तेल ; मलम , घायतेल पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP