|
पु. आगीचा भडका ; डोंब . होकां जे महाप्रळयींचा भडाडु । - ज्ञा ११ . ३०४ . मोठ्या शब्दाचा दणका ( तोफा , मेघगर्जना इ० कांच्या ); मोठा व गंभीर असा एकवटलेला आवाज ( सामान्यतः ). [ भड ] भडाडणें - अक्रि . भडकणें ; भबकणें ; धडधडां जळूं लागणें ( अग्नि ). भडाडे क्रोधाग्नीकरुनि मग तो तेच समयीं । - मध्व ५८१ . दणकणें ; धडाडणें ; मोठा शब्द करणें ( तोफा इ० नीं ). जोरानें वाहणें ; उफाळणें ( रक्त इ० ). मुखांतून शोणित भडाडलें । भडाडां , भडाभड , भडां - क्रिवि . जलद . झपाट्यानें व लागोपाठ पडणार्या वस्तूंच्या आवाजाचें , मोठ्यानें पुन्हां पुन्हां ओकण्याच्या अवाजाचें , तोफांच्या दणक्याचें , निंदा , धमकावणी व शिव्यांचा वर्षाव , तुफानी वारा इत्यादींच्या शब्दाचें अनुकरण होऊन .
|