|
गांवांतील शेतकर्याच्या पिकावर विशिष्ट हक्क असलेले हक्कदार. ( अ ) पाटील, कुलकर्णी, चौधरी, पोतदार, देशपांडया, न्हावी, परीट, गुरव, सुतार, १० कुंभार, १ वेसकर, १ जोशी. ( आ ) सुतार, लोहार, चांभार, माहार, कुंभार, मांग, गुरव, १० सोनार, १ जोशी, १ मुलाणा. -इंदापूर परगणा. सामान्य हक्क येणेंप्रमाणें - पहिली कास हक्क चार पाचुंदे ( पाचुंदे ) - महार. दुसरी कास हक्क पाचुंदे - न्हावी, तिसरीकास हक्क भट, १० मुलाणा, १ गुरव, १ कोळी. वेगवेगळया भागांत वेगवेगळे बलुतेदार आहेत व त्यांचे हक्का संबंधी वर्गहि वेगळे आहेत.
|