Dictionaries | References

धडक

   
Script: Devanagari
See also:  धडका

धडक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a concussion, shock, jog, jolt, blow, lit. fig. v मार, घे, लाग, बस, and esp. in the fig. sense of shock, भर. 2 A blow or loss in trade. v बस.
An imit. formation expressing rapidity and animation of action. Ex. महामारीनें ध0 माणसें मरतात Men die by heaps of the epidemic; तो वीर शत्रूवर ध0 धावतो That warrior dashes upon the foe; चोर ध0 घरांत शिरले The robbers rushed into the house; हा ध0 चालतो, ध0 मारतो, ध0 बोलतो He tears along; he whacks away; he rattles apace; काम ध0 चाललें The work proceeds swimmingly. This word is used with unbounded license, and in applications in which its implication, whether of rapidity or of animation, may not be apparent: but the learner will be prepared by the above examples. हा मार्ग ध0 काशीस जातो This road goes directly to Benares.

धडक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एका वस्तूचा दुसर्‍या वस्तूवर झालेला आघात   Ex. मोटारीची धडक बसून सायकलस्वार जखमी झाला.
HYPONYMY:
हिसडा
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धक्का ठोकर
Wordnet:
asmধাক্কা
bdसौवदावनाय
gujધક્કો
kasدَکہٕ
kokधपको
malകൂട്ടിയിടി
mniꯊꯦꯡꯖꯤꯟꯕ
nepधक्का
panਧੱਕਾ
tamமோதல்
telఢీ కొను
urdدھکا , تھپیڑا , ٹھوکر
See : टक्कर

धडक     

स्त्रीपु . १ ( अक्षरशः व ल . ) तडाखा ; आघात ; धक्का ; थडक ; टक्कर . ( क्रि० मारणे ; घेणे ; लागणे ; बसणे ). धडक मारिली नारदा । - भज ११२ . २ ( ल . ) धडकी , भीति इ० कानी काळजाला बसणारा धक्का . ( क्रि० भरणे ). ३ ( व्यापार इ० कांत येणारी ) बूड ; ठोकर ; घस ; नुकसान . ( क्रि० बसणे ).
क्रि.वि.  ( हे ध्वन्यनुकारी क्रियाविशेषण अनेक प्रसंगी अनिर्बंधपणे योजितात . त्यामुळे याचा निश्चित असा एकच अर्थ देतां येत नाही . संदर्भावरुनच स्पष्ट अर्थ कळणे शक्य आहे ). ( व्यापक ) ( भय , शंका , दैव इ० कानी ) प्रवृत्तीचा , गतीचा , क्रियेचा संकोच , अवरोध , विराम न होतां ; थेट ; सरळ ; अविरोध ; न थांबतां ; एकदम ; सपाट्याने इ० . ( येणे , जाणे , मरणे इ० ). जसेः - महामारीने धडक माणसे मारतात . यांत धडक = असंख्यांत पणे असा अर्थ , तो चोर धडक घरांत शिरला . यांत धडक = न कचरतां , एकदम असा अर्थ ; तो वीर शत्रूवर धडक धांवतो . या वाक्यांत तो वीर शत्रूवर तुटून पडतो असा अर्थ . येणेप्रमाणे धडक बोलतो - चालतो - मारतो इ० काचे अर्थ ध्यानांत येतील . हा मार्ग धडक काशीस जातो . या वाक्यांत धडक = नीट , सरळ , थेट असा अर्थ संदर्भावरुन सहज कळेल . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP