Dictionaries | References

दुजा

   
Script: Devanagari

दुजा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dujā a another, a second. 2 other, more, some besides. 3 different or diverse.

दुजा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   another, a second. other, more.

दुजा

दुजा

 वि.  क्रमाने दुसरा . एक्या पदे भूमि भरुनि थोडी । पाये दुज्या अंडकटाह फोडी । - वामन , वानचरित्र १ . ३१ . २ आणखी ; आणीक ; दुसरा ; अन्य ; इतर . मरे येक त्याचा दुजा शोक वाहे । - राम १६ . येक्या ग्रंथे निश्चय केलातो दुजयाने उडविला । - दा ७ . ९ . ४ . ३ भिन्न ; वेगळा ; निराळा ; परका . मला तुम्ही दुजा मानूं नका . त्यजि असू तो गमला दुजा न देहे । - मोरा पुष्पिताग्रा श्रीरामायण कल्पलता १५ . १ . ३६६ . [ दु = दोन + जा प्रत्यय ? ]
०भाव  पु. १ मनाचा दुटप्पीपणा ; आंत एक बाहेर एक अशी वृत्ति . २ मीतूंपणा ; भेदबुद्धि ; हा माझा , हा परका असे लेखण्याचा स्वभाव , वृत्ति ; परकेपणाची भावना ; आपपरभाव . ३ मतभिन्नता ; मतभेद ; कल्पनेत , समजुतीत फरक , अंतर . [ दुजा + भाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP