Dictionaries | References थ थाळा Script: Devanagari Meaning Related Words थाळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be ripened well and regularly--a corn-crop. 2 थाळा वाजणें g. of s. To be consumed or exhausted--an article of provision, money &c. थाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A metal vessel.थाळा वाजणें Be consumed-an article of provision money, &c. थाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ जेवणाचे वगैरे मोठे ताट . जेवणाराने मांडला थाळा , पण वाढणाराचा जाईना चाळा . २ लग्नामध्ये नवर्यामुलीला देण्याकरितां दागिन्याने भरलेले ताट . [ सं . स्थाली ] ( वाप्र . )०बसणे चांगले व जोरदार पीक येणे . पिकाचा - धान्याचा - शेताचा थाळा बसला .०भरणे नवरी मुलीस सुनमुखाच्या वेळी सर्व दागिने घालणे .०वाजणे ( खाद्य पदार्थ , पैसा इ० ). संपणे .०वाजविणे कोणत्याहि गोष्टीची द्वाही फिरविणे . ( बायकी ) मूल जन्मास आल्या बरोबर कांशाचा थाळा वाजवून आनंद प्रदर्शित करणे . सामाशब्द -०तांब्या पु. ताट व गडवा ( गरीब लोकांची संपत्ति ). ( क्रि० घेणे ; नेणे ; विकणे = गरीबाचे सर्वस्व घेणे इ० ). म्ह ० घेतला थाळा चालला जेवावयाला = आगंतुक मनुष्याच्या वर्णनपर .०वाटी स्त्री. ( ल . ) समूळ नाश ; मालमत्तेचा नाश ; निर्वंश ( थाळा व वाटी एकमेकांवर वाजविली असतां जेवण्याचे संपले असे सूचित होते यावरुन . ) थाळी स्त्री . १ लांकडे आणि विस्तव ठेवण्याकरितां जमिनीमध्ये खणलेली खळी , चर , चूल . २ लहान थाळा . [ सं . स्थाली ]०पिटणे चोहींकडे प्रसिद्ध करणे . थाळी ठावके न . ( व्यापक ) ताटवाटी इ० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP