Dictionaries | References ट टेंभा Script: Devanagari See also: टेंबा Meaning Related Words टेंभा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मशाल टेंभा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ झाडाचा डांभा ; खुंट ; खांबासारखा उपयोग केलेला ; २ ( ल . ) आधार ; आश्रय ; ३ काठीला वाळलेलीं पानें किंवा चिंध्या इ० गुंडाळून केलेली मशाल ( दरोडेखोर , उजेडासाठीं हिचा उपयोग करितात ); पलिता ; दिवटी . मग कुंडलिनियेचा टेंभा । - ज्ञा १२ . ५१ . ४ ( गोंधळांतील ) दिवटी ; दिवा ५ ( माण . ) बिन कांचेची व खालीं लांकूड असलेली टिनची राकेल तेलाची मोठी चिमणी मोठा काकडा . ६ डौल ; ऐट ; गर्व . [ दंभ ]टेंबा पहा .पुस्त्री . ( कों . राजा . ) लहान टेकडी ; उंचवटा ; टेंकाड .०पाजळणें १ दिवा लावणें . २ ( ल . ) ( कुत्सितार्थी ) एखाद्या अप्रसिध्द मनुष्यानें एखाद्या कृत्यानें किंवा श्रीमंतीनें एकाएकीं पुडें येणें ; प्रकाश पाडणें ; पराक्रम करून दाखविणें ; डौल मारणें . आपला टेंभा मिरविणें , आपला टेंभा चालविणें - दुसर्यावर आपलें वर्चस्व ठेवणें ; वरचष्मा करणें ; वरचढ होणें ; दिमाख दाखविणें .०मिरविणें ऐट करणें , दाखविणें ; डामडौल करणें , टेंभेकरी , टेंभ्या - पु . मशालजी ( दरवडेखोरांतील ). टेंभा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टेंबा पाजळणें[टेंभा=दिवटी, मशाल.] १. दिवा लावणें.डौल मारणेंप्रौढी मिरविणें. ‘‘मी यंव करीन त्यंव करीन’ अशी बडबड करून निजामाने आपल्या कर्तृत्वाचा मोठा टेंभा पाजळला होता.’’ जाधव०-जाधवरावाचा स्नेह भोसल्यांना पाहिजे तो स्वतःचा टेंभा पाजळण्याकरितां पाहिजे आहे, असे मला तर स्पष्ट दिसते आहे !’ -शिसं १.२. ‘पातिव्रत्याचा टेंभा पाजळतां पाजळतां अखेरीस त्याचा उपयोग पतीची चिता पेटवण्यात केलास !’ -उग्र ४.४.(उप.) कतृत्व दाखविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP