|
पु. १ झाडाचा डांभा ; खुंट ; खांबासारखा उपयोग केलेला ; २ ( ल . ) आधार ; आश्रय ; ३ काठीला वाळलेलीं पानें किंवा चिंध्या इ० गुंडाळून केलेली मशाल ( दरोडेखोर , उजेडासाठीं हिचा उपयोग करितात ); पलिता ; दिवटी . मग कुंडलिनियेचा टेंभा । - ज्ञा १२ . ५१ . ४ ( गोंधळांतील ) दिवटी ; दिवा ५ ( माण . ) बिन कांचेची व खालीं लांकूड असलेली टिनची राकेल तेलाची मोठी चिमणी मोठा काकडा . ६ डौल ; ऐट ; गर्व . [ दंभ ] पु. १ ( कों . ) झाडाचें , डोंगराचें शिखर , अग्र , टोंक , तुरा , शेंडा , शेवट , टोंक . ०पाजळणें १ दिवा लावणें . २ ( ल . ) ( कुत्सितार्थी ) एखाद्या अप्रसिध्द मनुष्यानें एखाद्या कृत्यानें किंवा श्रीमंतीनें एकाएकीं पुडें येणें ; प्रकाश पाडणें ; पराक्रम करून दाखविणें ; डौल मारणें . आपला टेंभा मिरविणें , आपला टेंभा चालविणें - दुसर्यावर आपलें वर्चस्व ठेवणें ; वरचष्मा करणें ; वरचढ होणें ; दिमाख दाखविणें . ०मिरविणें ऐट करणें , दाखविणें ; डामडौल करणें , टेंभेकरी , टेंभ्या - पु . मशालजी ( दरवडेखोरांतील ).
|