Dictionaries | References

टाळा

   
Script: Devanagari

टाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A small leafy branch; a spray or sprig.

टाळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Putting off or procrastinating: also shuffling off; amusing with delusive promises. The roof of the mouth. A spray or sprig.

टाळा     

 पु. १ तोंडाच्या वरच्या जबडयाचा आंतील भाग . २ ( क . शिंपी ) चांदवा . - शिकशि ३ . ५१ . ३ ( चांभार ) मोट शिवतेवेळीं दोन अघोडींमधील वरच्या बाजूस लाविलेला कातडी तुकडा ; जिभेच्या वरच्या चामडयाचा चांगलाजाड भाग . ४ ( बे . ) दाराचें एक झडप , फळी . ५ ( बे . ) जोंधळयाचें ताट . ( क्रि० लावणें ). टाळा कोरणें - वहाण ; जोडा इ० च्या खालच्या तळास नक्षी पाडणें . [ सं . तल ]
 पु. ( बडोदें ) कुलूप ( क्रि० मारणें ). टाळी पहा . [ ते . टाळमु . गु . ताळुं ]
 पु. ( राजा . ) टहाळा ; लहान खांदी . [ टाळणें ]
 पु. १ ढकलाढकल ; टोलाटोली ; पोकळ बढाई ( क्रि० मारणें ). २ टाळणें ; वारणें ; परिहार ; अडथळा ; गुंगारा ( त्रास उपद्रव , संकट यांना ). तो निजगुरुसुत म्हणुनि न दे परिभव दे तयासि कवि टाळा । - मोभीष्म ६ . ५७ .
०टाळ   टाळी - स्त्री . चालढकल ; भूलथाप चुकवाचुकव ; पूर्ण नाश . [ टाळणें ]

टाळा     

टाळा देणें
वारणें
टाळणें
पुढे ढकलणें. ‘टाळा म्‍यां त्‍यासि दिला, काळा बुध देति जेंवि फटकाळा।।’ -मोकर्ण ४०.३९. -भीष्‍मा ६.५७. ‘अफजलखान याने आपली निखालसता दाखविली. तेव्हां प्रसंगे पादशाहापाशी गेल्‍यावर पाहून घेऊं म्‍हणून टाळा दिला आणि चंजावरास गेले.’ -मराचिशिच २३.
टाळा पसरणें
एकसारखें रडणें. लहान मुले किरकिरतात, व्याधीने सारखी रडत असतात, तेव्हां त्‍यांस म्‍हणतात. मुलाने टाळा पसरला तो उजाडेपर्यंत मिटला नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP