|
स्त्री. १ डाळी ; वेळूचें केलेलें उथळ व पसरट शिपतर . २ या शिपतरांत कणकीचे दिवे , फळें ( आणि मराठयांत ) पुरणपोळया , कच्चे पापड इ० पदार्थ ठेवून याची पूजा करून ती विवाहसमारंभांत वधू वरगृहीं जाण्याच्यापूर्वी वराच्या आईस दान करितात , तो विधि . ऐरणीझालर पहा . चरव्या घागरी आणी झाली । हारे डेरे रत्नाचे । - वेसीस्व १४ . ३९ . [ का . जल्ली = वाटोळी वेळूची टोपली ( धान्य ठेवण्याची ), दुरडी ? झारगे , झालर पहा . ] स्त्री. १ ( कु . ) सुरमाडाच्या फळांचा व फुलांचा लोंबता घोंस . २ सुरमाडाच्या पानांचें केलेलें पायपुसणें . - पु . पुढील बैलांच्या शिंगाला बांधावायाचा केसांचा गोंडा . [ प्रा . झुल्ल . म . झुलणें ? ] स्त्री. ( ना . व . ) सायंकाळचा अंधार ; झांजड . आम्ही बाजारांतून परत आलों तों चांगलीच झाल पडली होती , लांबून माणूस ओळखतां येईना . [ सं . जाल ? ] स्त्री. १ एखाद्याच्या अंगावर लहान मुलानें टाकलेली झेंप , उडी , झांप . ( क्रि० टाकणें ). २ ( गोटयांच्या खेळांत ) गोटी विशिष्ट मर्यादेच्या बाहेर पडणें , फेकणें . ( क्रि० खाणें ). ३ एखाद्यावर रागानें धावून जाण्याची क्रिया . ( क्रि० जाणें ). ४ झोल ; झोकांडी ; चांचरी . ( क्रि० जाणें ). - वि . जहाल पहा . [ झोल ] ०जाणें ( कोणाएकावर ) त्याला उद्देशून अमर्याद भाषण करणें .
|