Dictionaries | References

चौघडा

   
Script: Devanagari
See also:  चौघडयाची अवटी

चौघडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. चौ0 वाजणें g. of s. To become or to be notorious.
caughaḍā m or चौघड्याची अवटी f A goldsmith's stamp to impress figures upon trinkets, gems &c.

चौघडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An assemblage of 4 kettledrums beaten by 2 men, 2 by each man.
चौघडा वाजणें   To become notorious.

चौघडा     

 पु. स्त्री . सोन्याचांदीच्या पत्र्यावर ठसे उमटावयाचें सोनाराचें एक साधन . [ चौ + घडा ]
 पु. १ देवालयांतून , राजवाडयांतून नित्य चार , चार घटकांनीं वाजविण्याकरितां कालू , नगारे , नौबती , सूर , सनई इ० . वाद्यांचा संच . - शर . प्रत्येकी दोन याप्रमाणें दोन मनुष्यांनीं वाजवावयाच्या चार नगार्‍यांचा समुदाय . यापैकीं दोन नगारे व दोन टिमक्या - झिला असतात . यावरून नौबती , सूर , सनई इ० . वाद्यांच्या समुदायासहि हाच शब्द लावतात . झडतो नामाचा चौघडा । - भज ६३ . २ एक मान ( चौघडा बाळगण्याचा ). हा मराठी राज्यांत विजयी सरदारास मिळे , त्याबद्दल सरकारांतून त्यास सालीना १२०० रु . ची नेमणूक मिळे . [ सं . चतुर + घटि = घडी , घटिका ; चतुर + घट = घडा ]
०वाजणें   ( कर्त्याची षष्ठी ). ( ल . ) एखाद्याची बदनामी होणें . चौघडी , चौघडया - वि . चौघडयांतील नगारा व झील वाजविणारा . [ चौघडा ]

चौघडा     

चौघडा वाजणें
चौघडा वाजूं लागला म्‍हणजे त्‍याचा आवाज जसा सर्वत्र पसरतो त्‍याप्रमाणे एखाद्याची सर्वत्र दूरवर बदनामी होणें
एखाद्याबद्दल फार गवगवा होणें
सर्वत्र अपकीर्ति पसरणें.

चौघडा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : खरायो

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP