|
स्त्री. ( संगीत ). १ गाण्यांतील सफाई , ठाकठिकी . २ गाणार्या कंठाचा कंप ; गिटकडी . ३ ( वाद्य . ) संबळाच्या दोन टिमक्यांपैकीं लहान आकाराची खणखणीत आवाजाची टिमकी ( मोठया व ढब आवाजाच्या टिमकीस बंब म्हणतात ). ४ ( क . ) चौघडा . झील सुरू करा . ५ एक प्रकारचें चर्मवाद्य . हें कडया एवढया टिमकीच्या आकाराचें असून याला प्राय ; कडयाच्या मधून सभोंवार खाचा पाडून लोखंडी अगर पितळी गोल पत्र्या किंवा झांजा बसविलेल्या असतात . ६ ( तमाशांत ) गाण्यांतील पालुपद ; ( तमाशांतील ) पुढील गाणारांनीं म्हटलेल्या भागाचें मागील साथीदारांनीं पालुपद म्हणून सुरांचा आरोह शेवटास नेण्याची जी साथ करावयाची असते ती . ७ ( व . ) बैलाच्या गळयांतील घुंगरमाळ . [ सं . झिल्ली ; हिं . झील ; फा . झील ] ( वाप्र . ) वि. हलकें . कां मेघाचें आंग झील । दिसे वारेनि जैसें जाईल । - ज्ञा १३ . २१३ . - क्रिवि . हळू ; मंदपणें . [ प्रा . दे . झिल्ली = लहरी , तरंग ? ] पु. १ मुलगा ; झिलगा . ( कों . गो . ) झीलो . तूं नंदाचो झीलो , माकां फडको दी । - भज ८ . - भवि ३५ . ५५ . २ एका झाडापासून केलेलें , उत्पन्न झालेलें दुसरें झाड . हा आंबा त्या आंब्याचा झील आहे . ३ ( ल . ) जवळजवळ नष्ट झालेल्या वंशांतील जिवंत मनुष्य , वंशाचा अंकुर . [ सं . झला = मुलगी ] न. ( प्रां . ) एका टोंकास जाळी लावलेली , झाडावरून आंबे इ० काढण्याची बांबूची आंकडी ; झेला . [ झेलणें ] स्त्री. ( गो . ) १ दाट झाडी . २ ( गो . ) ( विटीदांडूच्या खेळांतील ) एक सप्तक ; झकू . स्त्री. तकाकी ; चकाकी . जिल्हई पहा . झिलीची , झिल्हईची , झिल्लेची माती , झिल्हई , झिल्ली - स्त्री . भांडीं , हत्यारें साफ करण्याकरितां वापरतात ती पिवळसर तांबडी माती . स्त्री. रत्न इ०कांवरील तेज . [ अर . जिला ; म . जिल्हई ] ( वाप्र . ) एखाद्याची झील उडणें , एखाद्याची झील उतरणें , एखाद्याची झील बिघडणें - ( एखाद्याचें ) वैभव खालावत जाणें , नष्ट होणें ; कीर्तीचा , मानमरातबाचा नाश होणें . झील चढणेंस - ( कर्त्याची षष्ठी ). ( एखाद्याच्या ) वैभवाची , मोठेपणाची भरभराट होणें . झील चढविणें - १ अगदीं तकतकीत , साफ हजामत करणें , तासणें . २ ( एखाद्यास ) नांवारूपास आणणें ; प्रतिष्ठा मिळवून देणें ; मोठेपणाला चढविणें . पु. १ पाणथळ , दलदलीची जागा , जमिनीचा ओलावा दमसपणा ; आर्द्रता ; ओलसरा . एकेकडून पानें व शेरणीचीं बेटें व पाणियाची झील असे अडचणींत उतरलों . - भाब ५६ . २ झरा ; ओहोळ . [ सं . क्षीर . हिं . झील = सरोवर ] झीलाण - न . झिलाण पहा . [ झील ] ०ओढणें धरणें देणें - १ ( दुसरा ) गातानां त्याच्या सुराची साथ करणें . २ ( ल .) ( एखाद्याचा ) अनुवाद करणें ; री ओढणें , धरणें . झीलकरी झील देणारा - पु . ( तमाशांतील ) मुख्य गाणार्याची झील ओढणारे , धरणारे , सुरकरी . [ झील + करणें ]
|