|
स्त्री. गुजराथेंतील एक वाणी जात . [ सं . गुर्जर ; प्रा . गुज्जर ] गुजर , गुजरीण - पुस्त्री . गुजराथी माणूस ; गुजराथेंतील रहिवासी ( पुरुष , स्त्री ). गुजरडा - पु . गुजराला निंदा व्यंजक शब्द . पु. १ कसा तरी होणारा उदरनिर्वाह ; निर्वाह ; गुजारा , गुजराण पहा . तीनशें रुपये रोजांत गुजर होत नाहीं - दिमरा १ . ६१३ . २ चालढकल ; जोगवण ; निर्वाह . [ फा . गुझर ] गुजरणें - अक्रि . १ गुदरणें ; ( दिवस , काळ ) कंठणें ; घालविणें . सहा चार महिनें तियें गुजरले पुण्यास येऊनी । - ऐपो २७४ . २ नाहीसें होणें ( वैभव , संपत्ती , सौंदर्य ). ३ मरणें . ४ ओढवणें ; येऊन बेतणें ; कोसळणें ; येणें ( आपत्ति , संकट ). - उक्रि . १ ताब्यांत देणें ; स्वाधीन करणें ; दाखल करणें ( अर्ज वगैरे ). २ कायम करणें ; जागा देणें ; अधिष्ठित करणें ( हुद्दा , जागा ). [ फा . हिं . गुझरना ; फा . गुझर - गुझस्तनचें आज्ञार्थीं रूप . ]
|