|
पु. १ देऊळ , अंवारी देव्हारा , तंबुचा खांब , छपराचे टोकें इत्यादिकांवर सुशोभित किंवा रंगीत असा लांकडचा दगडाचा , बांधकामाचा वगैरे नक्षीदार कलशाकार जो भाग लावतात तो . ' राजमंडळाचे ढळले कळस । ' २ घुमटी ; शिखर . ३ ( ल .) उत्तरोत्तर होणार्य़ा वृद्धिचा ( मोठेपणाचा , चांगल्या किंवा वाईट कृत्याचा ) अतिरेक ; पराकाषाठा ; शिरोबिंदु ; शिकह्र ; ४ एखाद्या कामाचा शेवट , अंत ; पलटीधा प्रारंभ .' झाला भक्तीचा कळस । आले वसतीस दोष । ' - तुगा ४९२ . ५ मानेचा कळस , शिखर ; मस्तक डोकें . मानेचा कळस ढळणें = मरणोन्मुख होणें . ६ कलश ; लहान घागर ( मातीची किंवा धातूची ). कळ - सास येणें - संपणें . ' कळसा आला प्रबंधु । ' - ऋ १०३ . ' कळसा आलें निरुपण । प्रेम सज्जन जाणती । ' - एरुस्व १८ . ६० . ' कामहि आलें कळासासी .' - दावि ४६२ . ०होणें देऊळ वगैरे इमारतीवर कळस ठेविला म्हणजे बांधकामाची पूर्णता झाली असें होतें . त्यावरुन पूर्ण वैभवास चढणें ; जोर , तीव्रता , विस्तार वगैरेची पूर्ण वाढ होणें ( हा शब्दप्रयोग चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थीं वापरतात ).' वैभवाचा - दुःखाचा कळा झाला .' अवरंगजेबाच्या कारकीर्दींत मोगलसत्तेचा अगदीं कळस झाला होता .' ०पट्टी स्त्री. ( बांधकाम ) कळसांची नक्षी असलेली पट्टी , पान . ' माडीला कळसपट्टी सोनियाची । ' - लोक २ . ६८ . ०पाक ख - पु . पांढर्या वस्त्रावरील एक प्रकारची रंगीत वेलपत्ती , ( ओजीच्या आकाराची , उलट सुलट कळस असलेली ) ' नाना मछलीबंदरें । कळसपाखें दर्शनासी आलीं । - सप्र ९ . २८ . ०पाकीं वि. कळसपाक काढलेलें ( कापड , पागोटे ); विशिष्ट नागमोडी रंगीत वेलपत्तीचें ( वस्त्र , बायकांचें पातळ ). - भात्रै १० . ३ . १२६ . ( कळस + पाक ) ०वणी न. १ ( लग्नांत ) वधूवरें नहातेवेळी नवर्यामुलाच्या अंगावरील पाणी मुलीच्या अंगावर जें पडतें त्यास म्हणतात . ( सामा .) नवर्याचें उष्टें पाणी ; एक ग्रामाचार . ( सं . कलश + वन = पाणी )
|