Dictionaries | References

उपट सूळ खांद्यावर घेणें

   
Script: Devanagari

उपट सूळ खांद्यावर घेणें     

एक मनुष्य एका शहरातून चालला असतां त्यास वाटेत एका ठिकाणी एक सूळ पुरलेला आढळला. त्याने तो उपटून खांद्यावर घेतला व तो पुढे चालू लागला. सुळी द्यावयाच्या मनुष्यासच त्याचा सूळ खांद्यावर घेऊन न्यावा लागत असे. तेव्हा राजदूतांनी त्यास सूळी देण्याची शिक्षा झालेला मनुष्य समजून नेऊन सुळी दिला. यावरून, विनाकारण एखादे शुक्लकाष्ट मागे लावून घेणें
रिकामा उद्योग लावून घेणें
आपण होऊन एखादी भानगड आपणावर ओढून घेणें
आपण होऊन एखादे लचांड मागे लावून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP