|
पु. आषाढ ; अखाड पहा . म्ह० आखाडांत तट्टू , भादव्यांत भट्टू . ०झड स्त्री. आषाढ महिन्यांतील एकसारखा लागून राहणारा पाऊस . कंटाळवाणें , नीरस - भाषण . ०दवणा पु. दवणा किडा ( हा आषाढ महिन्यांतच आढळतो ). ०पाटी स्त्री. लग्न झाल्यानंतर येणार्या पहिल्या आषाढ महिन्यांतील वद्य पक्षांत वधुपक्षाकडून वराकडे फळफळावळ , मेवामिठाई व विटीदांडू , लगोरी चेंडू , भोवरा , सोंगट्या , बुध्दिबळें , कलमदान , गंजिफा वगैरे खेळण्याचें सामान व पोशाख वगैरे पाठवितात ती . ०पागोळी स्त्री. आषाढ महिन्यांत घराच्या वळचणींतून पडणारें पाणी . हें पाणी नवीन लग्न झालेल्या मुलीनें आपल्या सासरीं पाहूं नये ( म्हणून तिला माहेरीं धाडतात ). हें पाहिलें असतां सासूस वाईट . ०पाळी स्त्री. आषाढ महिन्यांत शेतास द्यावयाची कुळवाची पाळी . ०भूती पु. सोदा , लुच्चा , लबाड मनुष्य ; प्राचीन काळीं या नांवाचा कोणी लुच्चा माणूस असावा . आखाडभूती ऐसा जाण । गुरुपाशील न्यावया धन । उपदेश घेऊनि दीन । तो दांभिक जाण शठशिष्य - एभा २३ . २३६ . - स्त्री . कपटव्यवहार ; लुच्चेगिरी ; लबाडी ; भोंदूपणा ; ढोंग ; दंभ . ०लाणी लाहणी - स्त्री . आषाढ महिन्यांतील मेंढ्यांच्या केसांची कापणी , कातरणी , भादरणी . मेंढ्यांची आखाडलाणी झाली . [ सं . लु = कापणें ; सं . लवनं = कापणें ] ०सासरा पु. कोणी पुरुष दबावणीची किंवा उपदेशाची गोष्ट सांगूं लागला असतां त्यास बायका निंदेनें म्हणतात . ( ल . ) दुसर्यावर करडा अम्मल चालविणारा मनुष्य ; नसता मोठेपणा आपणाकडे घेऊन दुसर्यावर करडा अंमल चालविणारा मनुष्य ( लग्न झाल्यानंतर प्रथम येणार्या आषाढांत नव्या सुनेस सासर्याचें तोंड पहावयाचें नसतें व यासाठीं तिला दुसर्याच्या घरीं ठेवतात - तो परका मनुष्य तिच्यावर सासर्यासारखा अधिकार गाजवूं लागला म्हणजे त्यास आखाडसासरा म्हणतात यावरुन ). मोठा मेला आखाडसासरा उपदेश करायला आला आहे !
|