Dictionaries | References
अं

अंग्रेजी टोपी, जेम फेरवी तेम सिधी

   
Script: Devanagari

अंग्रेजी टोपी, जेम फेरवी तेम सिधी     

( गु.) आपल्याकडील पागोट्यांस पुढची बाजू व मागजी बाजू या अंगदीं दिसावयास वेगळ्या असतात. तसा इंग्रजी टोपीमध्यें पुढजी बाजू व मागची बाजू यांमध्यें फारसा फरक नसतो. दोन्ही बाजू सारख्याच दिसतात
त्यामुळें ती कशीहि घातली तरी ती फिरविल्यासारखें न वाटतां सरळच आहे असें वाटतें. त्याप्रमाणें इंग्रजी नीति ही केव्हांहि बदलतां येते. इंग्रजी नीतिमध्यें आपलीं मतें बदलणें, पक्ष बदलणें वगैरे गोष्टींस फारसें महत्त्व देण्यांत येत नाहीं. आपल्या फायद्यासाठीं वेळेवर कसेंहि उलट सुलट बोललें तरी चालतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP