|
पु. डोंगराचा , खडकाचा , कड्याचा शूळाप्रमाणे खाली रुंद व वर क्रमाक्रमाने निमुळता होत गेलेला माथा ; शिखर . सुळा दांत ; शंकुप्रमाणे निमुळता होत गेलेला एखाद्या वस्तूचा भाग . पीक कापल्यावर राहिलेला खुंट ; सरळ व वर निमुळता होत गेलेला वृक्ष . दाराच्या चौकटीचा एक भाग ; चौकटीच्या बाहीच्या उलट बाजू . ( कु . ) नारळ सोलण्याचे निमुळते हत्यार ; उत्कड . [ सं . शूल ] सुळकी - स्त्री . खुंटी , दांडा इ० चे निमुळते अग्र ; निमुळती झालेली कोणतीहि वस्तु . सुळकुंबा , सुळकंबा , सुळखांब , सुळखुंबा - पु . बैलरहाटाचे कणेकडाचे खाली आंत तुंब भरुन उभा केलेला निमुळता खांब , तुंब्याचा आधार . सुळका . सुळकेपट्टी - स्त्री . दाराच्या बाहेरच्या बाजूस माथ्यावर जशी गणेशपट्टी किंवा कपाळपट्टी असते तशी आंतल्या चौकटीची वरची पट्टी . सुळबुळाट - पु . सुळसुळाट पहा .[ सुळ ध्व . ] सुळबुळीत - वि . बुळबुळीत . सुळसुळ - स्त्री . सुळसुळाट पहा . सुळसुळणे - अक्रि . सुळकणे पहा . चुळबुळणे , चळवळणे . मागे मुंगळा लागणे ; धांदल उडणे . सुळसुळाट - पु . अतिशय मोठी चुळबुळ , गर्दी , वळवळ , चुळचुळ मुंगळा , धांदल , गडबड ( मुले , उंदीर , पक्षी , भिकारी , लोकांचा जमाव इ० ची - आंत बाहेर जेणे जाणे वगैरेची ). ( क्रि० लावणे ; मांडणे ; करणे ; लागणे ; सुटणे ; होणे ); छपरांतून उंदीर , साप इ० ची येरझार . फार त्रास . विपुलता . सुळसुळीत - वि . बुळबुळीत ; निसरते ( अतिशय जिल्हई दिल्यामुळे ). जीर्ण झाल्यामुळे उतरलेले ( धोतर इ० ).
|