वधू

ना.  उपवर कन्या , नवरी , नवरीमुलगी , सून .
.
 स्त्री. 
नवरी ; जिचे लग्न ठरले आहे , चालले आहे अशी स्त्री . - ज्ञा १४ . ३ .
पत्नी .
उपवर कन्या ; स्त्री ; विवाहयोग्य वयापासून यौवनदशा येईपर्यंतची स्त्री . भुले सुकवि वाग्वधू तव गुणा अनर्घ्या नगा । - केका ९९ .
( सामा . ) स्त्री . राजीवाक्ष असा विलोकुनी वधू धांवे जशी बावरी । - आशाबरी ९ . [ सं . ]
०पक्ष  पु. लग्नामध्ये नवरीकडील पक्ष .
०पक्षीय वि.  वधूपक्षासंबंधी ; नवरीमुलीकडील
०प्रवेश  पु. 
विवाहानंतर नवरीने नवर्‍याच्या घरी समारंभाने येणे .
या वेळचा विधि ; घरभरणी .
०माय  स्त्री. ( काव्य . ) नवरीची आई ( लग्न समारंभांत या नांवाने तिला संबोधितात ). [ माय + माता ]
०वरे   न अव . विवाहसमारंभातील वधू आणि वर उभयतां मिळून ; जोडपे ; नवरानवरी .
०वस्त्र  न. लग्नाच्या वेळचे वधूचे पातळ ; अष्टपुत्री . वधूटी स्त्री . आड बायको ; अर्धवट प्रौढ स्त्री .
 f  A bride; a wife.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person