|
पु. सर्प ; नाग ; ज्याच्या डोक्यावर दहाच्या आंकड्याचें चिन्ह असतें असा मोठा साप . बटीक , राख बाळगणारा मनुष्य ; जार . योग्य , क्षम , समर्थ , हुषार मनुष्य . तापट . क्रूर माणूस . [ सं . ] ०त्रस्तरेचित त्रस्त्ररेचितकरण - न . ( नृत्य ) पायाचें भुजंगत्रासित करुन दोन्ही हात डाव्या बाजूस रेचित करणें . [ सं . ] ०त्रासिक त्रासिककरण - न . ( नृत्य ) उजवें पाऊल कुंचित करुन दुसर्या पायाच्या मांडीशीं असें ठेवावें कीं , त्यामुळें पायांचा त्रिकोण व्हावा ; नंतर मांडी , गुडघा व कटि बाजूस वळविणें . [ सं . ] ०त्रासित त्रासितआकाशी - न . ( नृत्य ) पाय कुंचित करुन वर उचलून दुसर्या पायाच्या मांडीच्या पाठीमागें ठेवणें . नंतर मांडीकडील बाजूस असें वळावें कीं कोंपर व गुडघा हींहि वळल्यासारखीं दिसतील . [ सं . ] ०प्रयात न. एक वृत्त . याच्या चरणांत बारा अक्षरें असून य , य , य , य असे चार गण असतात . उदा० कुणी दुष्ट अंगास लावील हात । तरी दाखवावा भुजंगप्रयात ॥ [ सं . ]
|