|
पु. वस्त्राचा सैल व हलणारा शेवटाचा भाग ; घोळ ; घेर ( अंगरखा इ० चा ). २ परिधान केलेल्या वस्त्राचा इतर पदार्थास लागणारा लांब भाग , झोळ , घोळ . ३ कल ; तोल ; एकदम एका बाजूस वळणारी गति ; झोंक ; झटका ; फेर ; गिरकी . ( क्रि० देणें ). ऐकून मातेचा बोल । दिल्हा वनाकडे झोल । ४ झोंका ; डोल . झोल झोलों देवापासी जागावें रे । - दावि २०३ . - वि . थलथलीत . वयें उतार झोल शेवटीं । - अकक २ . उध्दवचिदघन , शुकरंभासंवाद २६ . [ सं . दोल ; प्रा . झुल्ल ; म . झुलणें . हिं . झूलना ] झोकांडा - पु . झोक ; झोंकांडी . ( क्रि० जाणें ). झोलणें - अक्रि . झोंका घेणें ; देणें ; खाणें ; डोलणें ; हालणें . झोलर , झोलार - वि . घोळाचें ; फुगीर ; झोल आलेलें ( छत , बाज , वस्त्र , इ० ). झोलविणें - सक्रि . झोंके घेणें , खाणें . देणें ; हलविणें . वि. ( व . ) लफंगा ; लबाड .
|