कीर्तन

ना.  कथा , गुणगान , पुराण , भजन , स्तुतिगान , हरिकथा .
 न. १ गाण्या - बजावण्यासह ईश्वराचें केलेलें गुण वर्णन ; पौराणिक देवादिकांचें कथानक घेऊन तें भक्तिरसानें साक्या दिंड्या , यांच्या साहाय्यानें सांगणें यांत पुर्वरंग व उत्तरंग असे दोन भाग असतात . पुर्वरंगांत एखाद्या संतानें केलेला तत्व बोध नाना प्रसंगांसह सांगुन उपदेश करतात व दुसर्‍या उत्तर रंगात एखाद्या राम , कृष्ण इ० श्रेष्ठ पुरुषाच्या चरित्रावर आख्यान लावून त्याच्या आयुष्यांतील प्रसंग गद्यपद्यादि प्रकारनें सांगतात व शेवटी आरती होऊन सर्वांना प्रसाद वाटतात . ' सगुण कथा या नांव कीर्तन । ' - दा . ४ . २ . २३ . २ ईश्वरनमोच्चार करणेम . ( सं .)
वि.  व्यापारी , विक्रीचा , किरकोळ जिन्नस . किरचण पहा . ' कालीकोटाहून बेपारी यांचा कीर्तन जिन्नस भरून जंजिरेस येत होता .' - आंघइ ४१० .
०भक्ति  स्त्री. देवाची स्तुति नेहमी करावी अशा आशयाची भक्ति जी ती ; नवविधा भक्तींतील एक प्रकार . ( सं .)
०रंगण  न. कथेची बैठक . ' कीर्तन रंगणीं ठाकलें । ' - दावि . २८० .
कीर्तनापेक्षां रात्रीचा गोंधळ बरा
गांवढ्या (गाढवा) पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता, पहा
अडाणी पहा.
  Celebrating the praises of a god with music and singing.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person