मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सत्ताविसावा|
श्लोक १ ला

एकनाथी भागवत - श्लोक १ ला

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


उद्धव उवाच -

क्रियायोगं समाचक्ष्व भवदाराधनं प्रभो ।

यस्मात्त्वां ये यथाऽर्चन्ति सात्वताः सात्वतर्षभ ॥१॥

निजभक्त अनुग्रहार्थ । सत्त्वमूर्ति तूं श्रीअनंत ।

तुझे निजभक्त जे सात्वत । ते तुज पूजित कोणे विधीं ॥१२॥

तें साधूचें आराधन । तुझें क्रियायोगें निजपूजन ।

कृपा करोनियां आपण । मज संपूर्ण सांगावें॥१३॥

म्हणसी जरी हें आणिकांतें पुसावें । हें माझेनि जाण सर्वथा नव्हे ।

तुज सांडूनि दूरी जावें । हे लाजही जीवें साहवेना ॥१४॥

मी तुझा दास जीवेंभावें । तुझेनि प्रभुत्व गौरवें ।

मी कळिकाळा नागवें । कृपाप्रभावें तुझेनी ॥१५॥

तूं कृपाळु कृपायुक्त । कृपेनें होसी भक्तांचा भक्त ।

त्या तुझा मी चरणांकित । सलगीं गुह्यार्थ स्वयें पुसें ॥१६॥

इतका करुनि अत्यादर । कां पुससी पूजाप्रकार ।

तरी हा श्रेष्ठश्रेष्ठीं केला विचार । तो निजनिर्धार अवधारीं ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP