एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


न मय्येकान्तभक्तानां, गुणदोषोद्भवा गुणाः ।

साधूनां समचित्तानां, बुद्धेः परमुपेयुषाम् ॥३६॥

जो न देखे विषयभेदु । ज्यासी समत्वाचा निजबोधु ।

तोचि बोलिजे ’शुद्ध साधु’ । परमानंदु मद्भजनें ॥१८॥

मी एक परमात्मा सर्व भूतीं । न देखे द्वैताची प्रतीती ।

ऐशी ज्याची भजनस्थिती । ’एकांतभक्ती’ त्या नांव ॥१९॥

सदा समभावें एकाग्र । माझ्या भजनीं अतितत्पर ।

ते प्रकृतीचे परपार । पावले साचार मद्रूपीं ॥४२०॥

ऐसे मद्भावें भक्त परिपूर्ण । ते न देखती दोषगुण ।

उद्धवा म्यां हे निजखूण । पूर्वीं तुज जाण सांगितली ॥२१॥

साकरेची साली फेडणें । कीं कापुराचा कोंडा काढणें ।

रत्‍नदीपाची काजळी फेडणें । तेवीं गुणदोष देखणें सृष्टीमाजीं ॥२२॥

ज्याचा घ्यावा अवगुण । मुख्य अवगुणी मी आपण ।

ज्याचा घ्यावा उत्तम गुण । तोही जाण मद्रूप ॥२३॥

यापरी भक्तजगजेठी । मद्रूपें देखे सकळ सृष्टी ।

त्यासी गुणदोषांची गोष्टी । न पडे दृष्टीं सर्वथा ॥२४॥

गुणदोष न देखावे जाण । हेंचि साधनीं मुख्य साधन ।

येचि अर्थीचें निरुपण । आदरें श्रीकृष्ण सांगत ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP