कडेपठारचे महाराज सवाई मलुखान = देव गेले शिकारी स्वारी वनाकारण = जी =
झाली अश्वावरती स्वार बाजू प्रधान संगे मानकर्याचा थाट वीर बळीवान = जी =
आघाडी येशवंतराव भडक निशाण - रणबाजे वाजे चौघडा राव शिकारखान = जी =
(चाल) देव खेळतो शिकार = ग = सा = गिरिकंदर भयासुर = सा =
धुंडती नद्या सरोवर = सा = झाले तृषागत मल्हार = सा =
नऊलक्ष मेंढया धनगर = सा =
एक चंनापुर नगर = सा =
ध्रु. = पाणी मागतां बाहेर आली बाणाई =
बाणु पाहता सुदबुद हारली सुचेना कांही = जी =
बोले म्हळसा सुंदरी ऐकर भाई =
देव गेले शिकारी अजून येत का नाहीं = जी = १ =
झाला प्रधानासी हुकूम परत रवाना तेदर कुच मजली आले जेजुरी भवना = जी=
रुप पालटले देव नटले धनगर बाना =
हाती काठी कांबळा चरणीं वाहाणा = जी =
थरथरा कांपती मान पायीं चालवेना =
हातपाई वाकडा आसाच केविलवाणा जी =
(चाल) गेले धनगराच्या घरी = सा =
नऊलक्ष बैसले पहारी गावडे लोक कारभारी = सा =
बोले रामराम मल्हारी सा आम्हा ठेवावें चाकरी
सा मी राहीन पोटावरी सा ।मिळवणी।
ठेविले बाणु घरी करवीली सोई
आणि त्यांनी वळाव्या मेंढया ताककण्या खाई धृ०
बोले म्हाळसा २ बाणू बोले ऐक सेवक बाणू बोलत
न्हेवुन मेंढ्या धुवा पंचगंगेंत जी
कुणी एक खिलारी नको आमच्या संगत
तुम्ही घेऊन भाकरी यावे दोन प्रहरांत जी
नऊ लक्ष केले हवाली मेंढयाची गणीत
मानुन बाणूचे शब्द देव अज्ञात जी
नऊ लक्ष मेंढया न्हेवून बुडविली काळ्या डोहांत
दहापांच धरीन गडीला आपटी खडकांत जी ।
चाल । लालीलाल गंगातीर रक्तपूर वाहाती सा
जशी कमळिणीचीं फुलें शीरावर तरती सा
गंगेने सोडले तास लाट ऊसळती सा
घडाघडा वाहती कडे आसुद कोसळती सा
चरमाचे पडले ढीग पर्वत दिसती सा । मिळवणी ।
देवाने केलें गारुड ऐका गुण ग्राही
नऊलक्ष मारली मेंढी जिवंत एक नाही जी घृ०
बोले म्हाळसा० ३ बाणूने करुनि सैपाक भरली पाटी
हाती अमृताचे घट तुपाची वाटी जी
आली चंनापूर सोडून गंगेच्या काठीं
आसुदाचे वाहती पुर पाहेना दृष्टीजी
ढगांतील चांदणी गगनीं सांगतील गोष्टी
ही निरंकारामदी जोतरत्न गोमती जी ।
स्वरुपाचे तुटती तारे पाहेना दृष्टी ।
जैसे पुनवेचे चांदणें प्रभा लल्लाटीं ।जी।
(चाल) बाणूनें मांडिला शोक रणी घैवती ।जी।
सावळे संतापून देती शिव्या हात आपटीती ।सा।
बाणू गडबडा लोळती केस तोडीती ।सा।
नऊ लक्ष मारिल्या मेंढया कपाळ बडवीती ।सा।
वृक्षावरुन पक्षी येऊन तिला समजवती ।सा। (मिळवणी)
बाणू रडता कशासाठीं झालें तुम्हा कांही ।
मला भूक लागलि थोर वाड लवलाही जी ।धृ०।बोले म्हाळसा० ॥४॥
आधीं उठवाल माझ्या मेंढया तेवां वाढील जे लागल ते जेवा इच्छा भोजन । जी।
असे उत्तर बाणूचे शब्द देव ऐकून ।
मूठ भरली भंडाराची नी दिली झोकून ।जी।
येती थव्यावरती थवे दिसती दुरुन ।
जशा मेघाच्या गडे धारा आल्या चोहोंकडून ।जी।
(चाल) अनुहात वाजवी घोळ देव गारुडी । सा।
येती थव्यावरती थवे मेंढ्याच्या झुंडी । सा।
गंगेवर पीती पाणी पडल्या मुरकुंडी ।सा।
लाल हीरवी पिवळी कबरी बांडी ।सा।
पाहून मनामधें दंग झाली बाणाई ।
गेली वैकुंठाला खबर खळली लवलाही । बोले म्हाळसा०॥५॥
बाणूने वाढिल्या कण्याताक परळांत ।
त्याची केली खीर पात्र करुनि अद्भूत ।जी।
खीर साखरेची वगवाही अमृत ।
साक्षात छत्रभुज जेवती मूर्त ।जी।
त्यावेळीं उतला वास आकाशमात ।
तेव्हां कडकडले आकाशमात गगन गडगडत ॥
वर कलाबतुचा जीन तुरंग नाचत ।
माथ्यावर कलकी सूर्यपान लवलवत जी ।
(चाल) देवानी केला डौलवान पठाणी । सा ।
बाणूने वळखला देव लागली चरणी । सा।
धन्य धन्य देवा अगाध तुमची करणी ।सा।
मजसाठी झाडिला वाडा वाहिलें पाणी ।सा।
मजसाठी झाला श्रमी हिंडतां वनीं ।सा।
झाले वारुवरती स्वार देवबाणाई ।
घरीं धनगराला कळली खबर लवलाही ।जी। बोले म्हाळसा ॥६॥
बाणू नेली शिपायांनी आयकली मात ।
तवां गजबजले धनगर मिळाले समस्त ।जी।
यानी परतल्या गोफण्या काठया हातांत ।
भीरभीरा मारती धोंडे जे गवसत ।जी।
देवानी झोंकली म्हवणी पाडली भ्रांत ।
एकमेकां मारिती आणून आपल्यांत ।जी।
(चाल) बाप ओळखना लेकाला काठया मारीत । सा।
भाऊ ओळखिना भावाला मान मोडीत ।
सा कुणी गडबडया लोळीतो आरोळ्या देत । सा।
कुणी बोबडा बोलतो चाचर्या जात ।सा।
पुरी करावी शिक्षा आता कृपा करावी ।या।
वनच्या पाखराला जात असावी ।जी।बोले म्हाळसा० ॥७॥
सावध केले धनगर जवळ बोलविले ।
साक्षात छत्रभुज रुप दाखविले ।जी।
मुखी देव आम्हाला बाणू रत्न सांपडले .
यामुळें देवाजी तुमचें दर्शन घडले ।जी।
अनंत जन्मीचे दोष पातक हरलें ।
गंगेसी मिळाले व्होळ गंगाजळ जहालें ।
(चाल) सारे चन्नापूर लोटले नगरनरनारी । सा।
नटथाट करुनि शिनगार आरत्या करीं ।सा।
हाती कणेराची फुलें एका झारी ।सा।
भजतात देव पुजतात भाव अंतरीं ।सा।
घाली देवाजीच्या गळां माळ बाणाई ।
स्वर्गींचा वाजला घंटा असल कोण ठाईं । बोले म्हाळसा० ॥८॥
संगत घेऊनी धनगर देव निघाला ।
दरकुच मजली मुक्काम भुलेश्वरी केला ।जी।
देवानें पत्र लिहिलें प्रधानाला ।
लाकुटयांत होती पत्र चिटी म्हाळसाला ।जी।
आणीक वरदी द्यावी बाल किल्ल्याला ।
आणिक वरदी द्यावी सकळ सैन्याला ।जी।
(चाल) धांवचालत जासुद आले ग जेजुरी ।सा।
प्रधान बसला होता भरुन कचेरी ।सा।
जासुद बोलती जोहार उभे दरबारी सा ।
प्रधान वाचितो पत्र घेऊन करी ।सा।
हालकरी फिरे सेनेंत जदल कारभारी
सुत भुलेश्वरा उपर स्वारी देख आई जी बोले म्हाळसा० ॥९॥
मोरेश्वरापासून दिव्याचा घाट जशी समुद्राला आली भरती
फौजेचा लोट जी दोहीतर्फे जोडिले कुंजर आटोकाट
ह्या भुलेश्वरापासून जेजुरी थेट जी
सुमर येती प्रधान चारी कडीकोट मुंगीसी होईना मिळेना वाट जी
(चाल) रथांत बैसले देव प्रधान सारथी सा
वर छत्री नि अबदागिरी चवर्या ढळती सा
चौघडे वाजती गती नव्वद झाई झाई
कर्हेवर ती आली स्वारी निशाण ओळखावी जी बोले म्हाळसा० ॥१०॥
आली पाऊतकावर स्वारी बाणू संगती
ऋषीमंडळ बोलती वेदसंकल्प देती जी
दुधीस्नान करुनिया गंगा थैयथैयती
चारी वरसत जळ उपर गिरत ऐय मोती.
स्वारीची करवलि कुचडंके वाजती
रथामागे धावती रथ कलाव घेती जी
तोफखाना करवला सुरु हुकूम सरबत्ती ॥
शहरांत पोंचली स्वार भारी मिरवती जी
म्हाळसा चढुनिया सज्जा किल्ल्यातून पाहाती
बाणूचीहि हिरवी गाडी रथामागें येती जी
नगरच्या नारि आरत्या ओवाळती
दोहीतर्फे सावकारमंडळी खुर्मुशा देती ॥जी॥
मनशाचे जुंपले वारु स्वारी वर चढती ॥
रंगमहाल प्रधानाच्या बैठका होती जी
(चाल) आणली बाणू ठेविली गुप्त मंदिरीं सा
रंगमहाल प्रधानाचा माडी शेजारीं सा
देव बैसले सद्रेवर भरुन कचेरी सा
ओंवाळूं म्हाळसा देव हरुष अंतरींसा
सभा तेहतीस कोटी इंद्राच्या ठाई
आले सुरनर नारद तुंबरु किन्नर गाईजी बोले म्हाळसा० ॥११॥
म्हाळसाने घेतला छंद गोष्ट ऐकावी
कशी आणली देवागना बाणूदा बाई जी
येवढी पंचायत तुला कशाला व्हावी
बाणू जातीची धनगरीण हिला काय पाहावी जी
सकळी मिळाल्या दवांगना त्या ठाईं
सर्वांची इच्छा बाणू दृष्टीने पाहावी जी
(चाल) केला प्रधानासी हुकूम बाणू बोलाविली सा
कर जोडोनिया बाणाऊची पुढें ठाकली सा
जसी पुनवेचि चंद्रप्रभा फांकली सा
म्हाळसानं पाहून बाणू कट्यार लागली सा
गुरु मुकुंदराव प्रसन्न बाणू गुण गाई यलबानी घडला घाट लक्ष सवाई
ह्या हरीभाऊची जो परीक्षा घ्यावी बापूने बसवला रंग सभा दंग व्हावी म्हाळसा ॥१२॥