प्रथम घंटा घेतला हातीं, प्रथम घंटा जी ॥
प्रथम घंटा घेतला हातीं, नमूं गणरायाला जी ॥
नमूं गणरायाला विनविती संगें सारजा जी ॥
सारजा कीं ज्याची होती जी रे जी, पायीं पैंजण रे रे ॥
पायीं पैंजणरजाजीन घागर्या वाजती ॥मिळवणी॥
अहो नमी नमले देव महाराज म्हाळसापती, जी ॥
गणराज आले तेव्हां धाऊन, गणराज आले धाऊन ॥
युद्धा मांडिला जी, महा दारुण दैत्य कापीले जी ॥
दैत्य कापीले ज्यांनी मर्दून आरे जी र जी ॥
धावा करती रे रे, धावा करती विघ्न हारती ॥
नमी नमले देव महाराज म्हाळसापती ॥२॥