जेजूर नगरी आजाव गुजरी नांदे मारतंड मल्हारी ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।
सभेसी बैसला कैलासराणा म्हाळसा बाणु दोघी या ललना ।
दोही बाजूला शोभे देवांगना ॥मिळवणी॥
भक्त येती नवस करिती प्रसन्न होती शिव हार हार हार ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापिती थार्थार् थार् ।
जेजुर नगरी अजाब गुजरी ॥१॥
नाम शोभले तुला मारतंडा त्रिलोकांमध्यें
शोभतो खंडा पिवळे निशाण झळकतो झेंडा ।
स्वर्ग घेतले, दैत्य मर्दिले, भक्त तारिले फार् फार् फार् ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।
नऊ लक्ष पायरी शोभे गडाला, दीपमाळा हारोहारी दोहि बाजूला ।
भक्तांची दाटी झाली दरवाज्याला, छंद देवाचा,
नाद घोळाचा, भंडाराचा होतो भडिमार ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार थार थार ।
चैत्र पौर्णिमेसी आनंद फार, भक्त मिळूनी करिती जयजयकार ।
विठु वाघा उभा जोडुनी कर, मनी भाव, चरणी ठाव,
देवा पाव हे मज फार् फार् फार् ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।