महाराज चरचिलें आगीं । भंडार भूशन पीवळे पीतांबर नेसुनी रेखिली भाळी ॥
महाराज ॥ उंच मैलागिरी चंदन, शिरी शिरी पेचतुरा, अंगामध्यें जामा ॥महाराज॥
पिवळी आसमान शोभती शाल पिवळी वरुन हातामधे खंडा ॥महाराज॥
झालि आसनावरती स्वार, हे गडी प्रधान बरोबरी पाहिले नयनी ॥महाराज॥१॥
महाराज उतरली स्वारी । किल्ल्याच्या तळवटी, झाली शहरामध्यें दाटी ।
देव पाहा जाती । महाराज । जाती होळकराच्या भेटी ॥
हातीवर निशान, वाजती घाटी ॥ छडी भालदार, संगे वोज वोटाटे उडती,
भले वान जेठी । महाराज ॥ कलावा घेती,
जाती कचेरीच्या कांठी रमस्थळ जागा ।महाराज ॥
जागा कर्हातीरीं, आमवशा दिवस सोमवारीं, पाहिलें नयनी ॥महाराज॥२॥
महाराज उडते पाणी ॥ स्नान कर्हाबाई निरमळ बाई ॥
चकरेमध्यें नाहाती ॥ महाराज ॥ जळो परवत पापांचें,
दर्शन होते पायांचें मनुश मिळालें ॥ महाराज ॥
देशोदेशींचें भवरगांव लहान मोठयाचे, घेणें देणें,
एका प्रहराचें, महाराज ॥ उठा वेळ झाला जलदी जायाचें जैजैकार होतो,
आम्हांवर उधळे भांडार, आणि पुढे वाद्याचा गजर पाहिलें नयनी ॥महाराज॥३॥
महाराज परतली स्वारी, जेजुरी नाम नगरी,
काळोखी रात्र अंधारी, दीप दिवटयाचा पाजळे म्हाद्वारी,
आणिक दीपमाळा हारोहारी, पुढें ललकारी ॥
महाराज, पोचली किल्ल्यावर स्वारी,
घेऊन देऊन उजवी बसले म्हाद्वारी ॥म्हा०॥
आनीक लोक शीवबंदी हाजेरी घेती ॥म्हा०॥
धनीक ऊंद सरकार, जोंधळे बतीस भंडार पाहिलें नयनीं ॥म्हाराज॥४॥