म्हाळसा म्हणे देवाला । करावा ग मान ॥अहो मान॥
मी नाहीं बोलले तुमच्या गळ्याची आण ॥
मी हो लग्नाची अस्तुरी म्हाळसा ग राणी ॥अहो राणी॥
कसा काय झाला अन्याय सांगा मजला कोणी जी ॥
हें बावन घरचें सोनें तरा तोलोनी ।
का उदास केलें, चित्त उरलें मन जी ।
जाई जुई आणि शेवंती शेष भरोनि ।
या उदाच्या उदबत्त्या, दिल्या लावोनि जी ॥
तुम्ही त्रिलोक्याचे धनी बसावें येऊनी ॥
मी नाहीं बोलले तुमच्या गळयाची आण ।
म्हाळसा म्हणे देवाला करावा ग मान ॥अहो मान॥१॥
तुम्ही उठा किं भोजनाला स्वामी हो राया ॥
हंडयामध्यें पाणी ठेविलें तुम्हाला न्हाया जी ॥
म्या वेळीलेत बोटावे, आणिक शेवया ॥
पांच ग्रास बसून जेवा स्वामी राया ।
या धरितवारि हिरा कशाचि ग छाया ॥अहो छाया॥
तुम्हावांचुनी माझी कोण धरील आज माया ।
तुम्ही दुसर्याचे ऐकुनि घेतले हो रान ।
मी नाही बोलले तुमच्या गळ्याची आण ॥२॥
बाणुचा कोठे ठिकाणा आणा हो ध्यानात ।
काळी काठी बाग लहान, खाण देशांत ।
आले बाणुला घेऊन पुरविला ग हेत ।
काय बाणुला आणून ठेविलें रंगमहालांत ।
डोईस मुदरा घडी झाली गावांत ।
बाळा कृष्ण करी जोडनी बहुत गंमत ।
चोहोकुन झाली दाटी लाग चालेना ।
मी नाही बोलले तुमच्या गळ्याची आण ॥३॥