मल्हार मल्हार वाचे घोका, पुढें पाऊल टाका ।
मल्हार मल्हार वाचे धोका ॥चाल॥
मल्हार धोकीता । चुकेल चौर्याऐशी यमाची फाशी ।
मल्हार मार्तंड तीर्थ काशी, ही घडेल कैशी ।
येऊन सार्थक करा जन्माशी जा भेटा त्याशी एवढा सांगतो मंत्र तुम्ही ऐका ।
पुढे पाऊल टाका ॥ मल्हार ॥१॥
मल्हार माझा गुणाचा मोठा हार घालूं कंठा याचें नांव घेतां सुचतील वाटा काय
पुजुनी गोटा शोधा मनीं अंतरीं ओळखा । पुढें पाऊल टाका ॥मल्हार॥२॥
मल्हार शिव शंकर भोळा भक्तिचा डोळा याला ओळखील,
तो एक विरळा त्याला लागल जिव्हाळा मोठा कनवाळु
मनाचा कवळा फार करील सोहोळा शोधा मनीं अंतरी ओळखा पुढें पाऊल टाका ॥मल्हार॥३॥