मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह २|
देऊळासी जातां लाजसी गव्हा...

संत तुकाराम - देऊळासी जातां लाजसी गव्हा...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


देऊळासी जातां लाजसी गव्हारा । दासीचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥

संतांसी देखोनी होसी पाठमोरा । दासीचिया पोरा दाम देसी ॥२॥

संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीसी अंघोळ सारी पाणी ॥३॥

संतांसी देखोनी करितो टवाळ्या । दासीचिया चोळया धुतो भावें ॥४॥

तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP