संत तुकाराम - नामावीण थोर नाहीं पैं आणि...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


नामावीण थोर नाहीं पैं आणिक । भवाब्धितारक हेंचि एक ॥१॥

उत्तमा उत्तम सर्वांही वरिष्ठ । नाम श्रेष्ठाश्रेष्ठ तिहीं लोकीं ॥२॥

शिवभवानीचें आवडीचें स्तोत्र । गुह्य बीज मंत्र एकांतींचा ॥३॥

तुका म्हणे तेथें इतरांचा पाड । कोण आहे वाड तयाहुनी ॥४॥

N/A


References : N/A
Last Updated : March 19, 2008