संत तुकाराम - आम्ही विठ्ठलाचे दूत । यम ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आम्ही विठ्ठलाचे दूत । यम आणूं शरणागत ॥१॥

हातो हातीं वाजवूं टाळी । करुं पातकांची होळी ॥२॥

करुं कथा हरिकीर्तन । तोडूं यमाचें बंधन ॥३॥

तुका म्हणे बळी । जन्मा आलों भूमंडळीं ॥४॥

N/A


References : N/A
Last Updated : March 19, 2008