संत तुकाराम - पूर आला आनंदाचा । लाट...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥

बांधूं विठ्ठल सांगडी । पोहुनि जाऊं पैलथडी ॥२॥

अवघे जन गडी । घाला उडी भाईंनो ॥३॥

हें तों नाहीं सर्वकाळ । अमूप अमृताचे जळ ॥४॥

तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥५॥

N/A


References : N/A
Last Updated : March 19, 2008