मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
सुखसहिता दु :खरहिता निर्म...

दत्ताची आरती - सुखसहिता दु :खरहिता निर्म...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता ।

कलिमलदहना गहना स्वामी समर्था ॥

न कळे ब्रह्मांदिकां अंत अनंता ।

तो तूं आम्हां सुलभ जय कृपावंता ॥ १ ॥

जय देव जय देव जय करुणाकारा ।

आरती ओंवाळूं सद्‌गुरुमाहेरा ॥ धृ. ॥

मायेविण माहेर विश्रांति ठाव ।

शब्दी अर्थी लाव बोलणें वाव ।

सद्‌गुरुच्या प्रसादे सुगम ऊपाव ।

रामीं रामदास फळाला सद्‌भाव ॥ जय. ॥ २ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP