मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
काकड आरती स्वामी श्रीगुरु...

काकड आरती दत्ताची - काकड आरती स्वामी श्रीगुरु...

निरंजनस्वामीकृत आरती


काकड आरती स्वामी श्रीगुरुदत्ता । सद्भावें ओवाळू चिन्मयरूप अवधूता ॥धृ॥
प्राणापानसमानव्यान उदान मिळाले ।
सुषुप्नेचे मार्गें दर्शनासि पातले ॥१॥
सोहं शद्बध्वनी मिळोनी सर्वांनीं केला ।
दशनाचा घोष अखंडित चालिअल ॥२॥
कुंडलनीचा वेढा काढुनि कांकडा केला ।
सत्रावीचीं घृतें नेउनि पूर्ण भिजवीला ॥३॥
सद्गुरुवाक्याचा चिन्मय प्रकाश पडला ।
निश्चय कांकडा नेऊनि तेथें पेटवला ॥४॥
निरंजन ओवाळू जातां तद्रूप झाला ।
सद्गुरुप्रसादें अहंभाव निमाला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP