दत्त आरती - पंचारति ओंवाळूं ॥ नित्य स...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.
पंचारति ओंवाळूं ॥ नित्य सहज्जानंदें भजनीं खेळूं ॥धृ.॥
देह हें ताट करूनी ॥ मन बुद्धि शुद्ध निरांजनी ॥ भक्तीचें घृत घालुनी ॥ ज्ञानज्योति अखंड दीप पाजळूं ॥१॥
जीवशिवमाया खोटी । चिद्विलासीं भासे सहज त्रिपुटी ॥ मिथ्या ही द्वैतरहाटी ॥ सद्गुरु निज बोधें द्वैत हें जाळूं ॥२॥
नाहीं मुळीं अहंममता । बंधमोक्षाची ही कल्पित वार्ता । खूण ही बाणली दत्ता ॥ निजरंगीं रंगुगीं रंगुनी स्वरूपी मिळूं ॥३॥
(पंतमहाराज)
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP