मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
पाळणा

पाळणा


पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing.


अजि अक्रूर हा नेतो श्रीकृष्णाला । सखे काळ कोठुनी आला ॥
कांहीं सुचेना मसीं काम धाम आणि धंदा । आठवितें आनंदकंदा ॥
मुळापासुनि मी होतें प्रभुचे छंदा । नाहिं दया आलि गोविंदा ॥
सांवळी मूर्ति आजि पाहूं
युक्तीने बहुत समजावूं
उत्तम गुण हरिचे गाऊं
नसे धीर मला जीव व्याकुळ झाला । सखे काळ कोठुनी आला ॥
या कृष्णानें लाविली ममता लटकी । बाई कपटी पुरता चटकी ॥

वश कुब्जेला झाला नगर नाटकी । आतां हरि तिसी लंपट कीं ॥

काय व्यर्थ आतां करुनियां वटवट कीं । झाली गोड प्रभूला बटकी ॥
सखे पुण्यभाग आजि सरला
मुरलीधर प्रभु अंतरला
सर्वस्वें उपाय हरला
जसें निष्फळ हे रत्‍नजडित अंधाला । सखें काळ कोठुनी आला ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP