मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
अक्रूराचा पाळणा

अक्रूराचा पाळणा

अक्रूराचा पाळणा Akrur Palana


अजि अक्रूर हा नेतो श्रीकृष्णाला । सखे काळ कोठुनि आला ॥

नाही सुचत मसी काम धाम आणि धंदा । आठवते आनंदकंदा ॥

मुळापासुनि मी होते प्रभुचे छंदा । नाही दया आली गोविंदा ॥

सावंळी मूर्ति आजि पाहूं

युक्तिने बहुत समजावू

उत्तम गुण हरिचे गाऊं

नसे धीर मला जीव व्याकुळ झाला ।

सखे काळ कोठुनि आला ॥

या कृष्णाने लाविली ममता लटकी ।

बाई कपटी पुरता चटकी ॥

वश कुब्जेला झाला नागर लटकी ।

आता हरी तिला लंपट की ॥

काय व्यर्थ आता करुनियां वटवट की ।

झाली गोड प्रभुला बटकी ॥

सखे पुण्यभाव आजि सरला

मुरलीधर प्रभु अंतरला

सर्वस्वे उपाय हरला

जसे निष्फळ हे रन्तजडित अंधाला ।

सखे काळ कोठुनि आला ॥

प्रभुचे रुप पहा जशि मदनाची मूर्ति ।

सच्चिद्‍घन अगम्य कीर्ती ॥

मुखचंद्राची काय वर्णु सुखपूर्ती ।

दर्शने कामाना पुरती ॥

दुष्ट दैत्यांचे हात पहा खुरखुरती ।

नलगे तिला तुर्तातुरती ॥

धन्य धन्य यशोदाबाई

तव सुत पहा शेषताई

कुंजवनी चारितो गाई

परब्रह्म गडे रुप दिसे आम्हांला । सखे काळ कोठुनि आला ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP