मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
जो जो जो जो रे सुकुमारा ।...

पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।...

पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing.


जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रय अवतारा ॥ध्रु०॥

कमलासन विष्णु त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरीं ॥

सत्‍व हरुं आले नवलपरी । भ्रम दवडीला दुरी ॥जो०॥

प्रसन्न त्रिमूर्ति होऊनि । पुत्रत्वा पावुनी ।

हर्ष झालासे त्रिभुवनीं । राहे ऋषिचे सदनीं ॥जो०॥

पालख बांधविला सायासीं । निर्गुण ऋषिचे वंशीं ।

पुत्र जन्मला अविनाशी । अनसूयेचे कुशीं ॥जो०॥

षट्‌दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।

कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥जो०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP