मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
मी लोटिते झोका तुज शिवबाळ...

शिवाजीचा पाळणा - मी लोटिते झोका तुज शिवबाळ...

शिवाजीचा पाळणा Shivaji Palana.

मी लोटिते झोका तुज शिवबाळा ।

सुंदरा नीज स्नेहाळा ॥धृ॥

तनशांतीते शांत नीज तुज येण्या । राष्ट्रगीत गाते तान्हा ॥

बघ दास्यि जळे मही अंबिका माय । हंबरडे फोडी हाय ॥

निजशत्रूंनी हिचे भंगिले छत्र । मांगल्य सूत्र स्वातंत्र ॥

या दु:खाने दु:खी फार रे पाही । मी तव जीजा आई ॥

बहु शत्रु मातले मेले ।

मेल्यांनी आर्यधन नेले ।

आमचे राज्य बुडवीले ।

कुणि निजपेना शास्ता या चांडाळा ।

सुंदरा नीज स्नेहाळा ॥१॥

भूमातेच्या भूतकाळि उद्धरणी । झूंजली राणी मृडरमणी ॥

श्रीरामाने रावण वधिला लढुनि । वानरा वीर बनवूनी ॥

घे स्वतंत्रता कंसाच्यापासुनी । गोविंद गोप जमवूनी ॥

तू तसा होशिल का ।

तरवार करी धरशिल का ।

मिळविशी मावळे गडी का ।

रणि वधावया देशरिपूंचा मेळा । सुंदरा नीज स्नेहाळा ॥२॥

भुभक्तीचे प्रबळ दुग्ध पाजीन । मी वीर तुला बनवीन ॥

रिपुरक्ते भू तुझ्या करी न्हाणीन । स्वातंत्र्य घरी आणीन ॥

साधीन सख्या जाण लोककल्याण । तुज राज्यपदी स्थापून ॥

स्वातंत्र्यवीराची माता ।

मी स्वतंत्र सुधन्य होता ।

ध्वज स्वातंत्र्याचा डुलता ।

ठेवीन तनू अशा आनंदमय वेळा । सुंदरा नीज स्नेहाळा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP