मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १| हें कोण गे आई ? संग्रह १ कुस्करूं नका हीं सुमने ! झरा डोळे हे जुलमि गडे ! जगाहून भिन्न तुजवीण विधवेचें स्वप्न मार्गप्रतीक्षा चिंवचिंव चिमणी पुंगीवाला यापरी असे जीवन ठावा न सुखाचा वारा गुराख्याचें गाणें कांतेस ती रम्या जननी संध्यातारक घटोत्कच माया आशा, शब्द आणि दर्शन सत्प्रीतिमार्ग वदन मदनरंगसदन कां रे जाशी मज त्यजुनी ? तीनी सांजा सखे, मिळाल्या बुल्बुलास ह्रदय सांग चोरिलें कशास सुंदरी ? तूं जिवलगे विद्यावती जाणती ! तारूण्यांतील एक प्रसंग चिरंजीव कोण ? बिजली जशि चमके स्वारी ! प्रेममाहात्म्य हिमाच्छन्न सरिता मुशाफिर आम्ही सान्त्वन ये पहाटचा वर तारा प्रीतीचा वास सखये, या स्थानीं दुष्काळानंतरचा सुकाळ चौघडा झडतो हा आणि तो कुपित अंगनेप्रत संदिग्ध ताना कळ्याकळ्यांत विहार क्रुद्ध सुंदरीस शैशवदिन जरि गेले निघुनी अजुनि लागलेंचि दार पाडवा वियोगिनी सृष्टिशिक्षण प्रणयवंचिताचे उद्गार आठवती ते दिन अजुनी कालाच्या चढुनी श्रमें- ललने चल चल लवलाही ! गेली ज्योति विंझोनिया शुक्राची चांदणी राजकन्या आणि तिची दासी आनंदी आनंद ! क्षिप्रा-चमळासंगम हें कोण गे आई ? रासमंडळ गोपीचंदन आईकडे न्या ! तर मग गट्टी कोणाशीं ? शिशुवंचन गतकाल अंधारांतून डोकावणारीं मुखें काळेभोर विशाळ केस पन्नास वर्षांनंतर निःशब्द आत्मयज्ञ हें कोण गे आई ? भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात Tags : b r tambekavipoemकविताकवीभा रा तांबे हें कोण गे आई ? Translation - भाषांतर नदीच्या शेजारीं गडाच्या खिंडारीं झाडांच्या ओळींत वेळूंच्या जाळींत दिवसां दुपारीं जांभळी अंधारी- मोडकें देऊळ त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठायीं रहातें गे आई ? १ चिंचांच्या शेंड्यांना वडांच्या दाढ्यांना ओढोनी हालवी कोण गे पालवी ? कोण गे जोरानें मोठ्यानें मोठ्यानें शीळ गे वाजवी पांखरां लाजवी ? सारखी किति वेळ ऐकूं ये ती शीळ ? २ वाळलीं सोनेरी पानें गे चौफेरी मंडळ धरोनी नाचती ऐकोनी किती मीं पाहिलें इत्केंची देखिलें, झाडांच्या साउल्या नदींत कांपल्या. हांका मीं मारिल्या, वांकोल्या ऐकिल्या. ३ उरांत धडधडे. धावतां मी पडे, पळालों तेथून- कोण ये मागून ? ४ N/A कवी - भा. रा. तांबे छंद - जीवनलहरी ठिकाण - इंदूर दिनांक - मे १९०७ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP